पुण्यातील हॉटेल्स अन् पब मालकांना पोलीस आयुक्तांचा मोठा दणका!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्णय घेतले जात आहेत. गुंड शरद मोहोळ याची त्याच्याच घरासमोर बंदुकीने गोळ्या झाडत हत्या झाली. शरदच्या जवळच्याच व्यक्तीने त्याचा घात केला. भरदिवसा पुण्यात (Pune News) घडलेल्या या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न विचारण्यात आले.

यानंतर सरकारने पुण्याचा कारभार डॅशिंग अधिकारी अमितेश कुमार यांच्याकडे सोपवला. पुणे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार (Pune Police Commissioner Amitesh Kumar) यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपुर्वी त्यांनी गुन्हेगारांची परेड सुद्धा घेतली होती. तेव्हा तब्बल 200 ते 300 कुख्यात गुन्हेगारांची ओळख परेड करण्यात आली होती.

यामध्ये गजा मारणे, नीरज घायवळ या कुप्रसिद्ध गुंडांचा समावेश होता. आता अमितेश कुमार यांनी पुण्यातील हॉटेल अन् पबसाठी नवीन निर्णय घेतला आहे. गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी त्यांनी आता आपला मोर्चा पब आणि हॉटेलकडे वळवला आहे.

हॉटेल अन् पबसाठी नवीन नियमावली

पोलिस आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयानुसार आता पुणे (Pune News) शहरातील पब आणि हॉटेल मध्यरात्री दीड वाजेनंतर सुरु ठेवता येणार नाही. या व्यवसायाला दीड वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. जर या नियमावलीचे पालन केले नाही तर संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

यासोबतच जर हॉटेलमध्ये बाहेरील कलाकार किंवा डीजे येणार असतील तर त्याची माहिती पोलिसांना देणे सक्तीचे केले आहे. तसेच, हॉटेल आणि पबमधील स्वच्छतागृह वगळून सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक असणार आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणातील डेटा साठविण्यासाठी दोन डीव्हीआर यंत्रे बसवावी लागणार आहेत.

कर्मचाऱ्यांसाठी नियम

आता हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसाठीही नियम असणार आहेत. या कर्मचाऱ्यांची चारित्र्यपडताळणी करणे बंधनकारक असणार आहे. कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल असल्यास त्याला कामावर ठेवण्यासाठी (Pune News) पोलिस उपायुक्तांची परवानगी घ्यावी लागेल. हॉटेलमध्ये स्मोकिंग झोन साठी स्वतंत्र जागा असावी. हे सर्व नियम बंधनकारक केले आहेत.

News Title – Pune News Police announced new rules for hotels and pubs in pune

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवार गटाला मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?

सर्वांत मोठी बातमी ! मराठा समाजाला ‘इतके’ टक्के आरक्षण मिळणार

विशेष अधिवेशनापुर्वीच मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला गंभीर इशारा!

एकटे टाटा सगळ्या पाकिस्तानवर ‘भारी’, शेजाऱ्यांच्या GDP ला टाकलं मागं

बाप तसा बेटा! ‘गड आला, पण सिंह गेला’, अर्जुन तेंडुलकरची ‘सर्वोत्तम’ कामगिरी!