Manoj Jarange Patil | मराठा समाजाच्या आरक्षणावर (Manoj Jarange Patil) गेल्या काही दिवसांपासून मराठा बांधव लढा देत आहेत. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली होती. मात्र ओबीसी समाज मराठा समाजाला आपल्या वाट्याचं आरक्षण देण्यासाठी तयार नाही. म्हणून सरकार मधल्यामध्ये पेचात पडले. यावर सरकारने मराठा समाजाचे सर्वेक्षण केलं आणि त्यातून राज्यामध्ये मराठा समाज हा 27 टक्के असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपल्यासह करोडो मराठा बांधव सोबत घेत मुंबईकडे कूच केली होती. मात्र त्यांना नवी मुंबई येथे थांबवण्यात आलं आणि त्यांना अध्यादेश देण्यात आला. आता मात्र सरकारने मराठा आरक्षणाचा मसुदा तयार केला आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मानस सरकारने आज विधिमंडळामध्ये मांडला.
विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणाच्या विधेयकाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे आणि टिकणारं आरक्षण देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले होते. यावर आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी संताप व्यक्त केला आहे.
विधेयक टिकण्यावर शंका
विधेयकाने कल्याण होणार नाही, आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवं आहे. उद्यापासून आंदोलन सुरू करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. विधेयकाला आमचा विरोध नाही, मात्र हे उद्या कोर्टामध्ये टिकेल का? यावर शंका आहे. आम्ही ज्यासाठी आंदोलन केलं आम्ही केलेल्या मागणीची सरकारकडून चेष्टा करण्यात आली, असा हल्ला मनोज जरांगे पाटील यांनी केला आणि त्यांनी स्व:च्या हाताची सलाईन काढून फेकली.
“मुख्यमंत्र्यांवर कोणाचा दबाव?”
“जी आमची मागणी नाही तिच मंजूर करून काय उपयोग काय? सगेसोयरेंबाबत सरकारला निर्णय घ्यायला हवा होता. मुख्यमंत्र्यांवर कोणाचा दबाव आहे का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आता मराठ्यांची ताकद काय आहे हे आता सरकारला कळेल”, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.
आंदोलनावर ठाम
हक्काच्या ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये सामावून घेण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उद्यापासून मराठा बांधव सोबत घेत आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला असून ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या मराठा आरक्षणाच्या विधेयकावर मनोज जरांगे संतापले आणि त्यांनी आपल्या हाताला लावलेली सलाईन काढली आणि त्यानंतर आंदोलन कायम राहिल, असा देखील इशारा दिला आहे.
News Title – Manoj Jarange Patil On maratha reservation
महत्त्वाच्या बातम्या
राज्यातील निवासी डॉक्टरांचा मोठा निर्णय, सरकारला दिला शेवटचा इशारा
कल्याणमध्ये पुन्हा राडा; गणपत गायकवाड प्रकरणात मोठा ट्विस्ट
‘या’ राशींवर राहील गणेश कृपा; पाहा आजचं राशीभविष्य