Suhani bhatnagar | बाॅलिवूडमधील दंगल या हिंदी चित्रपटातून घराघरात फेमेस झालेली अभिनेत्री सुहानी भटनागरचा मृत्यू झाला. वयाच्या 19 व्या वर्षी सुहानीने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. तिच्या जाण्याने बाॅलीवूडवर दुखःचा डोंगर कोसळला. कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दंगल या चित्रपटात अमीर खानने देखील तिच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. अभिनेत्रीच्या निधनानंतर आमिर खान देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं. मात्र सध्या चर्चा आहे ती झायरा वासीमच्या पोस्टची.
काय म्हणाली झायरा वासीम?
सोशल मीडियाच्या माध्यामातून झायरा वासीमने एक पोस्ट शेअर केली. ज्याची सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर झायरा वासीम म्हणाली की, ‘सुहानी भटनागर (Suhani bhatnagar) हिच्या निधनाची बातमी कळल्यानंतर दुःख झालं. माझ्या भावना मी शब्दातून व्यक्त करु शकत नाही.
या कठीण प्रसंगात सुहानी हिच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करते. तिच्या आई – वडिलांची काय अवस्था असेल, याचा विचार करुनच मन विचलीत होतं.’ अशी पोस्ट झायराने केली आहे.
तिच्या मृत्यूची अफवा?
झायरा वासीमला एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला त्यावेळी ती म्हणाली की, सुहानीच्या (Suhani bhatnagar) मृत्यूची बातमी कळली तेव्हा मला विश्वास बसत नव्हता. कदाचित ही अफवा असती. सर्वकाही खोटं असतं. सुहानी खूप चांगली होती. सुहानी हिच्यासोबत माझ्या अनेक आठवणी आहेत.’ असं म्हणत झायरा हिने देखील सुहानी हिच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. सध्या झायराने हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे.
सुहानी भटनागर हिचं निधन 18 फेब्रुवारी रोजी झालं आहे. सोशल मीडियावर सुहानी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुहानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. पण अभिनेत्रीचं स्वप्न पूर्ण होण्याआधीच तिचं निधन झालं आहे.
कोण आहे सुहानी भटनागर?
सुहानी भटनागर ही बॉलिवूडची प्रसिद्ध बालकलाकार होती. आमिर खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट दंगल (2016) मधील बबिता फोगटच्या भूमिकेसाठी तिला ओळखलं जातं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. तिने अनेक टेलिव्हिजन जाहिरातींमध्येही काम केलं. यामध्ये सुहानीने बबिताचा बालपणीचा रोल केला होता.
‘दंगल’नंतर सुहानीला (Suhani Bhatnagar) अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या, पण तिने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. तिला तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं होतं. अनेक मुलाखतींमध्ये सुहानीने सांगितलं होतं की, तिचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीत परतण्याची योजना आखली होती.
News Title : suhani bhatnagar death is rumour says zaira
महत्त्वाच्या बातम्या-
अन् रागाच्या भरात मनोज जरांगे यांनी सलाईन काढून फेकली, वाचा नेमकं काय घडलं?
“..तिथे तुम्हाला ऐश्वर्या राय नाचताना दिसेल”, ‘या’ नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
पुण्यातील हॉटेल्स अन् पब मालकांना पोलीस आयुक्तांचा मोठा दणका!
राज्यातील निवासी डॉक्टरांचा मोठा निर्णय, सरकारला दिला शेवटचा इशारा