लग्नाला 2 वर्ष झाली तरी पतीने शारीरिक संबंध ठेवले नाहीत; पत्नीचा आरोप, 6 जणांवर गुन्हा दाखल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Crime News | सोशल मीडियाच्या या जगात कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. सोशल मीडियावर भन्नाट व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. आता एक अनोखी घटना समोर आली आहे, ज्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये एक अनोखी घटना घडली. येथे एका महिलेने विचित्र तक्रार घेऊन पोलीस ठाणे गाठले. महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत. मग संतापलेल्या पत्नीने पोलिसांत धाव घेतली.

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलीस तपास करत आहेत. पीडित महिला बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील लालगंज पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. तिचा पती अहियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. महिलेने पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.

6 जणांवर गुन्हा दाखल

महिलेने पोलिसांना सांगितले की, 31 मे 2021 रोजी तिचे लग्न झाले होते. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. माहेरचे घर सोडून ती सासरच्या घरी आली. मात्र लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही तिच्या पतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत. ही गोष्ट तिने तिच्या सासरच्या इतर सदस्यांना सांगितली असता त्यांनीही काहीच दखल घेतली नाही.

तसेच जेव्हाही ती तिच्या पतीशी याबाबत बोलायची तेव्हा तो भांडण करायचा. एवढेच नाही तर तो तिला मारहाणही करायचा. ती म्हणाली की, आता मी सासरच्या घरी राहणार नाही पण आई-वडिलांच्या घरी गेली तर पती तिकडे गोंधळ घालेल. अशातच वडिलांची प्रकृती खालावल्याने पीडित महिला तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली. मात्र, आता मला सासरच्यांकडून धमक्या येत आहेत, असे तिने पोलिसांना सांगितले.

Crime News । पीडितेची संतप्त प्रतिक्रिया

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने आरोप केला की, तिच्या पतीने तिच्यासोबत कधीच शारीरिक संबंध ठेवले नाहीत. या प्रकरणी आरोपी पतीला बरेच स्पष्टीकरण देण्यात आले, मात्र तो मान्य न झाल्याने आता एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी पतीचे कुटुंबीयही महिलेवर दबाव आणत होते. याप्रकरणी पतीसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती शारीरिक संबंध ठेवत नसल्याने पत्नीने आवाज उठवला असता तिला तिच्या सासरच्यांनी तिला त्रास दिला.

News Title- In Bihar’s Muzaffarpur, the wife has filed a complaint with the police as her husband is not having physical relations
महत्त्वाच्या बातम्या –

भारतीय क्रिकेटमधील 2 दिग्गज ‘भाजप’त जाणार? लोकसभा लढण्याची शक्यता

विद्या बालनच्या अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची मुंबई पोलिसांत धाव, प्रकरण काय?

विराट-अनुष्काच्या लेकाचे नाव ‘अकाय’, जाणून घ्या याचा अर्थ

राहुल गांधी यांचं ऐश्वर्या रायबद्दल विधान अन् चाहते संतापले!

दीपिका आणि रणवीर सिंह यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर, लवकरच…