Sana Javed | भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्यात बिनसल्याच्या चर्चा कित्येक दिवसांपासून रंगत होत्या. त्यात मागच्या महिन्यात अचानक शोएब मलिक आणि सना जावेदच्या (Sana Javed ) लग्नाचे फोटो समोर आले. तेव्हा सानिया आणि शोएब विभक्त झाल्याचं जगाला कळालं.
2023 मध्ये शोएब मलिकने सना जावेदच्या बर्थ डे ला तिचा एक फोटो शेअर केला होता. तेव्हापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे म्हटले गेले. शोएबच्या विवाहबाह्य संबंधांमुळेच सानियाने त्याला ‘खुला’ दिल्याचं म्हटलं गेलं. शोएबने सनासोबत आपला संसार थाटला आहे. मात्र, त्याची ही कृती भारतासह पाकिस्तानी नागरिकांनाही आवडली नाहीये. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होत आहे.
शोएबने 10 वर्षाच्या संसारानंतर सानिया मिर्झाला घटस्फोट दिल्याने त्याच्यावर प्रचंड टीका झाली. त्याची पत्नी सना जावेदला या रोषाला सामोरे जावे लागले. नुकतेच पाकिस्तान सुपर लीग 2024 मध्ये हे दिसून आले. झाले असे की, मुल्तानच्या क्रिकेट स्टेडियममध्ये पाकिस्तानी प्रेक्षकांनी शोएबची पत्नी सना जावेदची खिल्ली उडवली. तिच्यासमोर सानिया मिर्झाच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली. याचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.
सना जावेद भडकली
पाकिस्तान सुपर लीग 2024 चा सामना बघत असलेल्या एका प्रेक्षकाने हा व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये सना जावेद (Sana Javed ) मैदानातील सीमारेषेजवळ फिरताना दिसून येत आहे. तिने काळ्या रंगाचा स्लीव्हसवाला टी-शर्ट आणि बॅगी जीन्स घातली होती. केस मोकळे सोडून खांद्याला हँडबॅग लावलेली होती.
It’s their prerogative, so there’s no need to taunt sana javed, every individual deserves respect, treating others poorly is unjustifiable#SanaJaved #ShoaibMalik pic.twitter.com/GHnBVhG23E
— Ashir (@wasmashr) February 20, 2024
तेवढ्यातच सना सीमा रेषेजवळून जात असताना स्टेडियममधील प्रेक्षकांनी सानिया मिर्झाच्या नावाने घोषणा देऊन तिला डिवचलं. सानिया मिर्झाच्या नावाच्या घोषणा ऐकून सना यावेळी चांगलीच भडकताना दिसून आली. तिच्या चेहऱ्यावर चिडण्याचे भाव दिसून आले. प्रेक्षकांकडे तिने चिडून पाहिलं व पुढे चालत राहिली.
शोएब मलिकचं तिसरं लग्न
शोएब मलिकची पत्नी सना जावेद (Sana Javed ) ही प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आहे. सना जावेदने 2012 मध्ये ‘शेहर-ए-जात’ या चित्रपटातून फिल्मी दुनियेत प्रवेश केला. यासोबतच तिने अनेक मालिकांमध्येही भूमिका केली.एका शूटदरम्यान शोएब आणि तिची भेट झाली. नंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. त्यांनी मागच्याच महिन्यात लग्न केलं आहे.
News Title- Sana Javed got angry after Sania Mirzas name was mentioned in Stadium
महत्त्वाच्या बातम्या –
विद्या बालनच्या अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची मुंबई पोलिसांत धाव, प्रकरण काय?
विराट-अनुष्काच्या लेकाचे नाव ‘अकाय’, जाणून घ्या याचा अर्थ
राहुल गांधी यांचं ऐश्वर्या रायबद्दल विधान अन् चाहते संतापले!
दीपिका आणि रणवीर सिंह यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर, लवकरच…
ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लेकीची शाळेची फीस माहितीये का?; आकडा वाचून थक्क व्हाल