करीना कपूरला बघून सर्वांसमोरच शाहिद कपूरने केलं असं काही की…; पाहा व्हिडिओ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shahid Kapoor | काल रात्री (20 फेब्रुवारी) मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. याचवेळी रेड कार्पेटवर बॉलीवुडमधील एक्स कपल समोरासमोर आल्याचं दिसून आलं. एकेकाळी प्रेमात आकंठ बुडालेले करीना कपूर आणि शाहिद कपूर (Shahid Kapoor) या सोहळ्यात एकमेकांसमोर आले.

या दरम्यानचा त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. दोघांनीही दिलेली रिअॅक्शन आता व्हायरल होत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील ही एकेकाळची अत्यंत प्रसिद्ध जोडी होती. त्यांनी एकत्र अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत.

शाहिद कपूरची ‘ती’ रिअॅक्शन व्हायरल

करीना कपूर आणि शाहिद कपूर (Shahid Kapoor) यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. शाहिद त्याच्या हातात ट्रॉफी घेऊन रेड कार्पेटवर उभा होता. त्याच्यासोबत आणखी दोघं जण त्यावेळी तिथं होते. त्याचवेळी करीना त्याच्यासमोरून जाते आणि शाहिदसोबत उभ्या असलेल्या एका व्यक्तीला हसून अभिवादन करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

यावेळी शाहिदचीही नजर करीनाकडे वळते. शाहिदसमोर न थांबता करीना पुढे निघून जाते आणि पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देते. मात्र करीनाला बघून शाहिद खूपच आनंदित होताना दिसला. यावेळी त्याने एक मोठी स्माईलही दिली. हा व्हिडीओ बघून चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

शाहिद आणि करीना एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते

करीना कपूर आणि शाहिद कपूर एकेकाळी सिरियस रिलेशनशिपमध्ये होते. ‘फिदा’ (2004) चित्रपटाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले होते. यानंतर दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. पण त्यांचे नाते फार वर्ष टिकलं नाही. शाहिद कपूर आणि करीना कपूर ‘जब वी मेट’ या चित्रपटानंतर वेगळे झाले असल्याचं म्हटलं जातं.

त्यानंतर करीनाने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. तर शाहिदने (Shahid Kapoor) आणि मीरासोबत लग्नगाठ बांधली. करीनाला तैमुर आणि जेह ही दोन मुलं आहेत. तर शाहिद-मीराला मिशा आणि झैद ही दोन मुलं आहेत.

News Title-  Shahid Kapoor and Kareena Kapoor Video goes Viral

महत्त्वाच्या बातम्या –

विद्या बालनच्या अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची मुंबई पोलिसांत धाव, प्रकरण काय?

विराट-अनुष्काच्या लेकाचे नाव ‘अकाय’, जाणून घ्या याचा अर्थ

राहुल गांधी यांचं ऐश्वर्या रायबद्दल विधान अन् चाहते संतापले!

दीपिका आणि रणवीर सिंह यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर, लवकरच…

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लेकीची शाळेची फीस माहितीये का?; आकडा वाचून थक्क व्हाल