रेडिओवरचा लोकप्रिय आवाज हरपला! अमीन सयानी यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ameen Sayani passed away | रेडिओ/ विविध भारतीचे सर्वांत प्रसिद्ध अनाऊंसर आणि टॉक शोचे निवेदक अमीन सयानी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अमीन सयानी (Ameen Sayani passed away) यांचा मुलगा राजिल सयानी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

बुधवारी सकाळी सहा वाजता हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना एच.आर. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान अमीन सयानी यांचं निधन झालं. रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या 12 वर्षांपासून त्यांना पाठीच्या दुखण्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांना चालताना वॉकर वापरावा लागत असे. त्यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

अमीन सयानी यांचं निधन

रेडिओ सिलोन आणि विविध भारतीवर जवळपास 42 वर्षांपर्यंत चालणाऱ्या हिंदी गाण्यांचा त्यांचा कार्यक्रम ‘बिनाका गीतमाला’ अत्यंत लोकप्रिय होता. ‘गीतमाला’सोबत उदयोन्मुख संगीत लँडस्केपची सखोल समज दाखवून संपूर्ण शो क्युरेट करणारे आणि सादर करणारे अमीन हे भारतातील पहिले होस्ट होते.

अमीन सयानी (Ameen Sayani passed away) यांनी जवळपास 19 हजार जिंगल्सना आपला मधुर आवाज दिला होता. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये झाली होती. त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा होता. त्यांना दर आठवड्याला जवळपास 65 हजार पत्रं यायची.

‘बहनों और भाइयों..’ आवाज हरपला

त्यावेळी अमीन सयानी (Ameen Sayani passed away) दिवसाला 12 तास काम करायचे. ‘भाइयों और बहनों’ या नेहमीच्या ओळीविरुद्ध ‘बहनों और भाइयों’ असं म्हणत संबोधित करण्याची त्यांची शैली त्याकाळात खूप प्रसिद्ध होती. त्यांनी भूत बंगला, तीन देवियाँ, कत्ल यांसारख्या चित्रपटांमध्ये अनाऊंसर म्हणूनही काम केलं आहे.

यासोबतच रेडिओवर सेलिब्रिटींवर आधारित त्यांचा शो ‘एस कुमार्स का फिल्मी मुकादमा’ तेव्हा खूप गाजला होता. आज अमीन सयानी यांच्या निधनाने रेडिओ सृष्टीत शोककळा पसरली आहे.

News Title- Ameen Sayani passed away  

महत्त्वाच्या बातम्या –

करीना कपूरला बघून सर्वांसमोरच शाहिद कपूरने केलं असं काही की…; पाहा व्हिडिओ

‘सिरियल किसर’ इमरान हाश्मीचा धक्कादायक खुलासा, म्हणाला..

सानिया मिर्झाचं नाव घेताच भडकली सना जावेद, व्हिडीओ तूफान व्हायरल

धोनीनं अन्याय केला, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी; क्रीडा मंत्र्याचे गंभीर आरोप

अखेर ठरलं! ‘या’ ठिकाणी होणार IPL चे सामने; तारीखही आली समोर