मनोज जरांगे सरकारवर भडकले; केली महत्त्वाची मागणी

Manoj Jarange

Manoj Jarange Patil | गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारकडे मागणी केली होती. त्यांना कुणबी म्हणजेच ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं असल्याची मागणी केली होती. मात्र राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी इतर कोणत्याही आरक्षणास धक्का न लागता आरक्षण देणार असल्याचं सरकार म्हणालं होतं. यापार्श्वभूमीवर सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचं विधीमंडळामध्ये आश्वासन दिलं आहे.

विधीमंडळामध्ये 20 फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी सरकारने विधेयक मांडले होते. यावेळी सर्व पक्षीय नेत्यांनी हे विधेयक मान्य केलं. मात्र मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना हे विधेयक मान्य नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आरक्षण कोर्टामध्ये टिकणार असल्याचं देखील ते म्हणाले. मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना या विधेयकावर शंका आहे. हे आरक्षण कोर्टामध्ये टिकणारं नाही असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांना ओबीसी प्रवर्गातील आरक्षण हवं असल्याचं ते म्हणाले आहेत. “हे सर्व आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. लोकांचा सरकावर विश्वास आहे. विश्वासघात करू नका”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. “आम्ही वाशीत सांगितलं होतं की गुलालाचा आपमान करू नका. कोण आरक्षण देत नाही? नाहीतर सांगा तुम्हीच आरक्षण देत नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

“मोटारसायकल दिली पण पेट्रोल नाही”

मोटारसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. कालच्या विधेयकाचा सामान्य लोकांना फायदा व्हायला हवा होता. तुम्ही मोटारसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं आहे. तुम्ही जर दोन्ही दिलं असतं तर अंगावरचा 15 दिवस गुलाल निघाला नसता, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

“ओबीसीमधून आरक्षण हवंय”

आम्हाला ओबीसीमधून आरक्षण हवं आहे. आता टप्प्यात आंदोलन करणार आहे. टप्प्याशिवाय आंदोलन करणार नाही. पहिल्याच टप्प्यात त्यांना आंदोलन करणार असून त्यांना चांगला दणका बसणार आहे. 12 वी च्या विद्यार्थ्यांना आंदोलनाला कोणताही त्रास होणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारवर टीका करताना दिसत आहेत. हे सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे. तसेच त्यांना पुन्हा एकदा 106 निवडूण आणायचे आहेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

News Title – Manoj Jarange Patil On state government about maratha reservation

महत्त्वाच्या बातम्या

करीना कपूरला बघून सर्वांसमोरच शाहिद कपूरने केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ

‘सिरियल किसर’ इमरान हाश्मीचा धक्कादायक खुलासा, म्हणाला..

सानिया मिर्झाचं नाव घेताच भडकली सना जावेद, व्हिडीओ तूफान व्हायरल

धोनीनं अन्याय केला, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी; क्रीडा मंत्र्याचे गंभीर आरोप

अखेर ठरलं! ‘या’ ठिकाणी होणार IPL चे सामने; तारीखही आली समोर

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .