“आमदाराने रिसॉर्टवर बोलावलं अन्..”, प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत खळबळजनक खुलासा

actress Trisha Krishnan Action against A.V. Raju

Trisha Krishnan | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन (Trisha Krishnan) हिच्याबद्दल धक्कादायक खुलासा झाला आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या अभिनेता मंसूर अली खानविरोधात संताप व्यक्त केला होता. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.

एका आमदाराने तृषा कृष्णन विरोधात वादग्रस्त विधान केल्याने चांगलाच वाद निर्माण झाला आहे. यामुळे तृषाने थेट कारवाईचा इशारा दिला आहे. तिने एक पोस्ट करत कारवाईचा इशारा दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

एआयएडीएमके (AIADMK) पक्षाचे माजी नेते ए.व्ही. राजू यांनी तृषा कृष्णन विरोधात खळबळजनक वक्तव्य केलं आहे. अभिनेत्रीला एका आमदाराने रिसॉर्टवर बोलावलं होतं, ज्यासाठी तिला मोठी रक्कम देण्यात आली होती, असं वक्तव्य ए.व्ही. राजू यांनी तृषा कृष्णनबद्दल (Trisha Krishnan) केलं आहे.

याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. याबाबत आता तृषाने मोठं पाऊल उचललं आहे. यावरूनच तृषा चांगलीच भडकली आहे. तिने आमदार विरोधात कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

काय म्हणाली तृषा कृष्णन?

“केवळ इतरांचं लक्ष वेधण्यासाठी तुच्छ व्यक्तींना वारंवार अत्यंत खालच्या स्तरावर झुकताना पाहणं घृणास्पद आहे. याविरोधात आवश्यक आणि कठोर कारवाई केली जाईल. यापुढे जे काही बोलायचं असेल किंवा कारवाई करायची असेल ते माझ्या लीगल डिपार्टमेंटकडून केलं जाईल”, अशी पोस्ट तृषा कृष्णनने (Trisha Krishnan) केली आहे.

यापूर्वी ‘लिओ’ चित्रपटात तृषासोबत काम केलेला अभिनेता मंसूर अली खानने तिच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. “जेव्हा मला समजलं की तृषासोबत मला एक सीन शूट करायचा आहे, तेव्हा मी विचार केला की एखादा बेडरुम सीन असेल. मी तिला बेडरुममध्ये घेऊन जाईन, जे मी आधीही अनेक अभिनेत्रींसोबत केलं आहे. मी याआधीही बलात्काराचे अनेक सीन्स शूट केले आहेत. यामध्ये नवीन असं काहीच नाही. मात्र काश्मीरमध्ये शूटिंग सुरू असताना मला तृषाला पहायला सुद्धा दिलं गेलं नाही”, असं तो म्हणाला होता. आता या आमदाराने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

News Title- actress Trisha Krishnan Action against A.V. Raju

महत्त्वाच्या बातम्या –

सानिया मिर्झाचं नाव घेताच भडकली सना जावेद, व्हिडीओ तूफान व्हायरल

धोनीनं अन्याय केला, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी; क्रीडा मंत्र्याचे गंभीर आरोप

अखेर ठरलं! ‘या’ ठिकाणी होणार IPL चे सामने; तारीखही आली समोर

चाणक्याच्या ‘या’ 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, खिसा कायम पैशांनी भरलेला राहील!

लग्नाला 2 वर्ष झाली तरी पतीने शारीरिक संबंध ठेवले नाहीत; पत्नीचा आरोप, 6 जणांवर गुन्हा दाखल

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .