WPL 2024 चं बिगुल वाजणार; ‘या’ शहरात होणार सामने, वाचा सविस्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

WPL 2024 | WPL च्या सामन्यांची अनेक ठिकाणी चर्चा होती. आता चर्चेला पूर्ण विराम प्राप्त झाला आहे. वुमेन्स प्रीमिअर लीगचं (WPL 2024) बिगुल वाजलं आहे. दिल्ली विरुद्ध मुंबई इंडियन्स असा पहिला सामना होणार आहे. हे संघ गेल्या वुमेन्स लीगमध्ये अंतिम सामन्यामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये होते आणि आता या दोन्ही संघाचा यंदाच्या वुमेन्स लीगमध्ये पहिला सामना होणार आहे. (WPL 2024)

यंदाच्या वुमेन्स लीगमध्ये 5 संघ खेळणार आहेत. हे सामने दोन शहरांमध्ये होणार आहेत याबाबतची माहिती समोर आली आहे. वुमेन्स प्रीमिअर लीगची तारीख देखील समोर आली आहे. येत्या 23 फेब्रुवारीला वुमेन्स लीग (WPL 2024) सुरू होणार आहे. याच दिवशी पहिला सामना हा मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघादरम्यान होणार आहे.

वेळापत्रकानुसार सामना जर सायंकाळी असेल तर सायंकाळी 7 वाजता नाणेफेकी केली जाईल. त्यानंतर सामन्यास सुरूवात होणार आहे. दिल्ली आणि मुंबई हा पहिला सामना चेन्नईतील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

या चॅनेलवर पाहू शकता सामने

वुमेन्स लीगचे सामने कुठे पाहावेत असा प्रश्न असेल. हे सामने पाहण्यासाठी आपण टीव्हीवर स्पोर्ट्स 18 सह कलर्स सिनेप्लेक्सवर लाईव्ह पाहता येणार आहे.

लाईव्ह सामने पाहा 

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघामध्ये 23 फेब्रुवारीला सामना होणार आहे. हे सामने ऑनलाईन लाईव्ह पाहण्यासाठी जिओ सिनेमाचा वापर करावा. तसेच वेबसाईटवरही हे सामने निशुल्क पाहता येणार आहेत.

आयपीएलप्रमाणे आता वुमेन्स लीगचाही मोठा चाहता वर्ग आहे. यामध्ये देखील महिला खेळाडूंचा लिलाव केला जातो. यामुळे महिला क्रिकेटपटूंमध्ये आणि या लीगला वेगळं स्थान निर्माण झालं आहे. यामुळे भारतातील क्रिकेट या खेळाचा दर्जा सांभळला गेला असून टिकून आहे.

News Title – WPL News 2024 News update 

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरलं! ड्रग्ज रॅकेटबाबत धक्कादायक खुलासा समोर

मनोज जरांगे सरकारवर भडकले; केली महत्त्वाची मागणी

“आमदाराने रिसॉर्टवर बोलावलं अन्..”, प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत खळबळजनक खुलासा

अजित पवार गटाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

रेडिओवरचा लोकप्रिय आवाज हरपला! अमीन सयानी यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन