“त्या रात्री वाशीत गुप्त मिटींग…”; मनोज जरांगे पाटलांच्या जवळच्या मित्राच्या आरोपांनी मोठी खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा लढा सुरु आहे, आता त्यांनी नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर अत्यंत गंभीर आोरप करण्यात आले आहेत, या आरोपांमुळे मराठा आंदोलनात एकच खळबळ उडाली आहे. हे आरोप दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर मनोज जरांगे पाटील यांचा सख्खा मित्र म्हणवल्या जाणाऱ्या माणसाने केले आहेत.

मनोज जरांगे यांचा अत्यंत जवळचा मित्र म्हणवल्या जाणाऱ्या आणि किर्तनकार अजय महाराज बरासकर यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी यासंदर्भात मुंबईत पत्रकार परिषद घेत आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे.

मनोज जरांगे यांच्यावर नेमके कोणते आरोप?

मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी लढा लढत आहे. मधल्या काळात अंतरवाली सराटीमध्ये घटना घडली आणि मी आंदोलनाच्या लढ्यात पुन्हा एकदा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी मी सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो होतो. मी यापूर्वी केव्हाच माध्यमासमोर आलो नाही. मी मनोज जरांगे याला आता पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही, असं अजय महाराज बरासकर यांनी म्हटलं आहे.

वाशीच्या आंदोलनाबाबत धक्कादायक खुलासा-

मनोज जरांगे हा एक नंबरचा नाटकी माणूस आहे. त्याच्या मिटिंग या नेहमी रात्री होतात. वाशीला आंदोलन पोहचलो, त्या रात्री गुप्त मिटिंग घेतल्या गेल्या, असा धक्कादायक आरोप बरासकर यांनी केला आहे. अधिसूचनेत म्हटलं, ते 16 तारखेला लागू होईल पण त्याची इच्छा होती, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथं येऊन मला पाणी पाजावं. जरांगेला फक्त श्रेय हवं होतं. जेसीबीतून फुलं हवीत, आरक्षण गरिबाला हवंच आहे. पण याचं काय? याला तर फक्त श्रेय हवं आहे, असं म्हणत अजय महाराज बरासकर यांनी खळबळ उडवून दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मुलांवरही महाजारांनी भाष्य केलं आहे. ” देव माझ्या बापाच्या पाया पडेल, असं मनोज जरांगेची मुलगी म्हणते. मुलांमध्ये इतका अंहकार कुठून आला?, सांगा हा देवापेक्षा मोठा आहे का?, अशा शब्दात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मुलांचा सुद्धा समाचार घेतला आहे.

हा माझ्यावर आरोप करतो की मी सरकार आणि भुजबळचा माणूस आहे म्हणून, पण माझा आणि कोणाचाच संबंध नाही. आजपर्यंत एक पत्र सुद्धा त्यानं स्वतः सरकारला दिलं नाही. तो रोज पलटी मारतो… सगळ्या मिटिंग कॅमेरावर करतो, याला घोडा लावतो, त्याला घो#@ लावतो, असं अजय महाराज यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

WPL 2024 चं बिगुल वाजणार; ‘या’ शहरात होणार सामने, वाचा सविस्तर

मराठा समाजाला मोठा धक्का!, सरकारनं दिलेलं नवं आरक्षण पुन्हा कोर्टाच्या फेऱ्यात

पुणे हादरलं! ड्रग्ज रॅकेटबाबत धक्कादायक खुलासा समोर

मनोज जरांगे सरकारवर भडकले; केली महत्त्वाची मागणी

“आमदाराने रिसॉर्टवर बोलावलं अन्..”, प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत खळबळजनक खुलासा