पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?; ड्रग्ज कनेक्शनबाबत सर्वात मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | शिक्षणाचं माहेर घर असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. पुण्यात दहशतीचं वातावरण निर्माण होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. कोयता गँगनंतर पुणे आता ड्रग्ज प्रकरणात चर्चेचा विषय ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या ससून रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट संंदर्भात गुंड ललित पाटीलला कैद करण्यात आलं होतं. त्यानंतर देखील ड्रग्ज प्रकरणात पुण्यात नवनवीन माहिती समोर येत असतानाच पुण्यात पुन्हा एकदा ड्रग्ज विक्रिचा पडदा फाश करण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पुण्यात (Pune News) सध्या गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिलेली नाहीये. त्यामुळे या शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. दरम्यान, काल पुण्यात पुन्हा एकदा 100 कोटींचे ड्रग्ज सापडले असून याचं थेट कनेकश्न भारताची राजधानी दिल्लीत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी मुख्य आरोपींना ताब्यात घेतलं असून याबदल आणखी तपास करत आहेत.

हे सुरु असताना अणखी एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. पुणे क्राईम ब्रांच सांगलीमधे कारवाई करत असताना, मिठाच्या पाकिटात 10 किलो एमडी ड्रग्स मिळाले. पुणे (Pune News) पोलिसांकडून दोन कारवायांमध्ये 1100 कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी कुरकुंभ एमआयडीसीमधील एका फॅक्टरीमधून 600 किलोच्या आसपास साठा जप्त केला आहे. ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई समजली जात आहे.

ड्रग्ज प्रकरणातील गुंडांची नावं समोर-

पोलिसांची हाती लागलेले आरोपी हे पुण्यातील असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणात, विकी माने, हैदर शेख (विश्रांतवाडी), अनिल साबळे, अजय करोसिया आणि युवराज भुजबळ या ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ड्रग्ज प्रकरणातील एका इंजिनिअरला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपीकडून महत्त्वाची माहिती समोर-

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून नवनवीन खुलासे समोर येत आहे. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता एक एक माहिती समोर आली. त्यानुसार विश्रांतवाडी आणि कुरकुंभमध्ये छापा टाकला. कुरकुंभमध्ये हा ड्रग्सचा कारखाना असल्याचं एका आरोपीच्या चौकशीत समोर आलं.

News Title : pune news drugs connection is from sangli

महत्त्वाच्या बातम्या-

पुणे हादरलं! ड्रग्ज रॅकेटबाबत धक्कादायक खुलासा समोर

मनोज जरांगे सरकारवर भडकले; केली महत्त्वाची मागणी

“आमदाराने रिसॉर्टवर बोलावलं अन्..”, प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत खळबळजनक खुलासा

अजित पवार गटाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

रेडिओवरचा लोकप्रिय आवाज हरपला! अमीन सयानी यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन