मॉडेलच्या आत्महत्या प्रकरणी ‘हा’ स्टार खेळाडू अडचणीत; ‘तो’ शेवटचा फोन कॉल…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

अहमदाबाद | सुरतच्या पॉश भागात वेसूमध्ये राहणाऱ्या मॉडेल आणि फॅशन डिझायनर तान्या सिंगने (Tanya Singh) आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता या आत्महत्येमागचं कारण जाणून घेण्यासाठी सुरत पोलीस आता कॉल डिटेल्सच्या आधारे तपास करत आहेत. 28 वर्षीय मॉडेलची क्रिकेटर अभिषेक शर्मासोबतचे फोटो पोलिसांना सापडले आहेत.

‘हा’ स्टार खेळाडू अडचणीत

प्राथमिक तपासात प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली आसावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मॉडेल तान्याने गळफास घेतला तेव्हा तिच्या कानात इअरफोन होते.

मॉडेल तान्या सिंगच्या (Tanya Singh) मोबाईलमध्ये क्रिकेटर अभिषेकसोबतचे अत्यंत इंटिमेट फोटो पोलिसांना सापडले आहेत. मॉडेल तान्या सिंग सुरतच्या वेसू भागात असलेल्या हॅप्पी एलिगन्समध्ये राहत होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार तान्या मॉडेलिंगसोबतच फॅशन डिझायनिंग आणि डीजेचे कामही करायची.

‘त्या’ शेवटच्या फोन कॉलमुळे संशय

फोनमध्ये क्रिकेटरसोबतचे सेल्फी आणि इंटिमेट फोटो सापडल्यानंतरच सुरत पोलिसांनी अभिषेक शर्माला तपासासाठी बोलावलं आहे. दोघांचं ब्रेकअप झाल्याचंही समोर येत आहे.

मॉडेल तान्या भवानी सिंग ही मूळची राजस्थानमधील सीकरची आहे. रात्री उशिरा घरी परतल्यानंतर मुलीने आत्महत्या केल्याने कुटुंबीय हादरले आहेत. तान्या गेल्या अडीच वर्षांपासून फॅशन डिझायनिंग आणि मॉडेलिंग करत होती.

तान्याचे वडील पांडेसरानी मिलमधील व्यवस्थापनाचे काम पाहतात. भाऊ कॅनडामध्ये शिकत आहे, तर एका बहिणीचे लग्न झाले आहे. आत्महत्येपूर्वी तान्याने अभिषेकशी बोलल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र पोलीस कॉल डिटेल रिपोर्ट आणि आयपीडीआरची वाट पाहत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘आरक्षणाची लढाई सोडून द्या, कारण…’; गुणरत्न सदावर्तेंचा मराठा तरुणांना सल्ला

गोल्डनमॅन पंढरीशेठ फडके यांच्या मृत्यूचं कारण आलं समोर!

‘या’ SIP मुळे तुम्हीही व्हाल मालामाल, जाणून घ्या अधिक

परीक्षेत अफाट यश हवंय?, मग चाणक्याचे ‘हे’ शब्द कायम लक्षात ठेवा

पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?; ड्रग्ज कनेक्शनबाबत सर्वात मोठा खुलासा