बारामतीच्या राजकारणात आणखी एक पवार, अजित पवारांचं टेंशन वाढणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit pawar vs Yugendra pawar | गेल्या काही दिवसांआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा टाकला. निवडणूक आयोगाने देखील पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांचं असल्याचा निर्णय दिला होता. यामुळे शरद पवार गट गोत्यात आल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार यांनी भाजपशी युती केली आणि आपल्या सख्ख्या काकांविरोधाच बंड केलं आहे. यामुळे आपल्या आजोबांना साथ देण्यासाठी बारामतीमध्ये आपल्या काकांच्या विरोधात पुतण्या दोन हात करणार असल्याची चर्चा आहे. (Ajit pawar vs Yugendra pawar)

बारामतीच्या राजकाणात आणखी एक पवार 

काका आणि पुतण्या हे राजकारणातील विरोधक म्हणून एक समीकरण उदयाला अल्याचं दिसत आहे. रोहित पवार आणि अजित पवार हे देखील काका आणि पुतणे आहेत. यांच्यामध्ये काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. रोहित पवार आणि शरद पवार हे देखील काका पुतणे आहेत. तसेच आता अजित पवार यांच्याविरोधामध्ये त्यांच्याच पुतण्याने शरद पवार यांना पाठिंबा दिला असल्याच्या चर्चा आहेत. (Ajit pawar vs Yugendra pawar)

पवार कुटुंबातील राजकारण हे अजित पवार यांनी बंड केल्यानंतर पवार कुटुंबाभोवती फिरणार असल्याचं बोललं जात आहे. कारण आता बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव आहे. तर त्यांच्याविरोधामध्ये सुप्रिया सुळे असणार आहे. अशातच आता अजित पवार यांचा पुतण्या देखील शरद पवार यांना पाठिंबा देत आहे. (Ajit pawar vs Yugendra pawar) युगेंद्र पवार असं अजित पवार यांच्या पुतण्याचं नाव असून त्यांचा पाठिंबा शरद पवार गटाला आहे.

पवार कुटुंबात पुन्हा काका-पुतण्या संघर्ष?; अजित पवारांना अस्मान दाखवण्याच्या तयारी असणारे युगेंद्र पवार कोण?

कोण आहेत युगेंद्र पवार?

युगेंद्र पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कार्यालयातील कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे आणि युगेंद्र हे व्यवसायिक आहेत. ते शरद पवार गटाच्या कार्यालयामध्ये आल्यानं ते देखील बारामतीच्या राजकारणाचा भाग होणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते पुत्र आहेत. ते संयमी, हुशार आणि शांत आहेत. तरूणांचे नेतृत्व करण्याकडे त्यांचा कल आहे.

शरयु फाऊंडेशन बारामतीच्या माध्यमातून ते काम करत असतात. शरयु अॅग्रो कंपनीचे ते सीईओ आहेत. तरूणांनी राजकारणात यावं आणि नेतृत्व करावं असा त्यांचा मानस आहे. युवा पिढीसाठी ते मोलाचं काम करत आहेत. बारामतीतील विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे ते खजिनदार आहेत. आणि बारामती कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नातवाने म्हणजेच युगेंद्र यांनी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यामुळे ते शरद पवार गटामध्ये अधिकृत प्रवेश करतील अशा चर्चा आहेत. तसेच बारामतीमधील अनेक तरूण पिढी ही त्यांच्या पाठिशी असेल अशा चर्चा आहे.

News Update – Ajit pawar vs Yugendra pawar News Update

महत्त्वाच्या बातम्या

मॉडेलच्या आत्महत्या प्रकरणी ‘हा’ स्टार खेळाडू अडचणीत; ‘तो’ शेवटचा फोन कॉल…

‘आरक्षणाची लढाई सोडून द्या, कारण…’; गुणरत्न सदावर्तेंचा मराठा तरुणांना सल्ला

गोल्डनमॅन पंढरीशेठ फडके यांच्या मृत्यूचं कारण आलं समोर!

‘या’ SIP मुळे तुम्हीही व्हाल मालामाल, जाणून घ्या अधिक

परीक्षेत अफाट यश हवंय?, मग चाणक्याचे ‘हे’ शब्द कायम लक्षात ठेवा