मंदिरावरही लागणार ‘कर’, ‘हिंदूविरोधी’ म्हणत काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Karnataka | कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून भाजपने लागू केलेल्या योजनांना पूर्णविराम मिळाला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील सरकारने अलीकडेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखूचे व्यसन केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला. अशातच आयकर विभागाचा दाखला देत भाजपने कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारला ‘हिंदूविरोधी’ म्हटले आहे. मंदिरांवरील 10 टक्के करावरून भाजपने कर्नाटक सरकारवर जोरदार टीका केली आहे.

बुधवारी सिद्धरामय्या सरकारने ‘कर्नाटक हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय एंडोमेंट बिल 2024’ मंजूर केले. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर भाजपने कर्नाटकातील काँग्रेस सरकारला ‘हिंदूविरोधी’ म्हटले आहे. कर्नाटक भाजपचे अध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा म्हणाले की, काँग्रेस सरकारला हिंदूविरोधी धोरणांचा अवलंब करून आपली रिकामी तिजोरी भरायची आहे.

काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली!

मंदिरांवरील कराच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यात जुंपली आहे. कर्नाटक भाजपचे अध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा म्हणाले की, काँग्रेस सरकार राज्यात सातत्याने हिंदूविरोधी धोरणे अवलंबत आहे. त्यांना हिंदूविरोधी धोरणे अवलंबून आपली रिकामी तिजोरी भरायची आहे. आपली रिकामी तिजोरी भरण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

राज्यातील काँग्रेस सरकार सातत्याने हिंदूविरोधी धोरण अवलंबत आहे. काँग्रेसने आता हिंदू मंदिरांच्या महसुलावरही वाईट नजर टाकली आहे, अशी टीका विरोधकांनी केली. येडियुरप्पा म्हणाले की, काँग्रेसने आपली रिकामी तिजोरी भरण्यासाठी हिंदू धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल एंडोमेंट विधेयक मंजूर केले आहे. काँग्रेसला हा पैसा इतर खासगी कामांसाठी वापरायचा आहे. केवळ हिंदू मंदिरांनाच का लक्ष्य केले जात आहे, इतर धर्मांना का नाही?

Karnataka । राजकारण तापलं

दरम्यान, मंदिरांच्या मुद्द्यांवरून कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे. येडियुरप्पा यांच्या टीकेनंतर चांगलेच वातावरण तापले. येडियुरप्पा यांच्या वक्तव्याचा निषेध करत कर्नाटकचे मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी भाजपवर धर्म राजकारणात आणल्याचा आरोप केला. काँग्रेसच हिंदुत्वाचा खरा समर्थक असल्याचे ते म्हणाले. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर सरकार 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या मंदिरांकडून 10 टक्के उत्पन्न गोळा करेल, असेही त्यांनी नमूद केले.

तसेच या विधेयकानुसार कर्नाटकातील ज्या मंदिरांचे उत्पन्न 1 कोटींपेक्षा जास्त आहे त्यांना 10 टक्के कर भरावा लागणार आहे. त्याचबरोबर ज्या मंदिरांचे उत्पन्न 10 लाख ते 1 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे त्यांना पाच टक्के कर भरावा लागणार आहे.

News Title – A war of words has raged between the ruling Congress and the BJP in Karnataka over the imposition of tax on temples

महत्त्वाच्या बातम्या –

IPL फायनलची तारीख ठरली; धोनीच्या गडातून होणार स्पर्धेची सुरूवात!

…तर खेळाडूंना मिळणार 1 कोटी अन् BMW कार; HCA ची मोठी घोषणा

बारामतीच्या राजकारणात आणखी एक पवार, अजित पवारांचं टेंशन वाढणार?

मॉडेलच्या आत्महत्या प्रकरणी ‘हा’ स्टार खेळाडू अडचणीत; ‘तो’ शेवटचा फोन कॉल…

‘आरक्षणाची लढाई सोडून द्या, कारण…’; गुणरत्न सदावर्तेंचा मराठा तरुणांना सल्ला