लोकसभा निवडणूक: निवडणूक आयोगाने शुभमन गिलवर सोपवली मोठी जबाबदारी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shubman Gill | देशभरात आगामी काळात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे. आगामी निवडणुकांमुळे आयपीएलच्या वेळापत्रकातही बदल करण्यात येणार असल्याचे कळते. भारतीय क्रिकेट संघ सध्या मायदेशात इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. भारताचा सलामीवीर शुभमन गिल साजेशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरला. अशातच निवडणूक आयोगाने गिलवर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलला पंजाबचा स्टेट आयकॉन बनवण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने त्याच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. निवडणुकीपूर्वी तो मतदारांना मतदानाबाबत जागरूक करताना दिसेल. ही माहिती मुख्य निवडणूक अधिकारी सिबिन सी यांनी दिली.

गिलवर नवीन जबाबदारी

सध्या गिल भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत खेळत आहे. गिलकडे नवी जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शुभमन गिल स्वतंत्रपणे या मोहिमेचा एक भाग असेल. मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा या मागील उद्देश आहे, जेणेकरून राज्यातील मतदानाची टक्केवारी 70 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकेल.

पंजाबमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 13 जागांसाठी 65.96 टक्के मतदान झाले होते. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी 70 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ‘यावेळी 70 पार’ असा नाराही आयोगाकडून देण्यात आला आहे. सिबिन सी पुढे म्हणाले की, शुक्रवारी पंजाबच्या सर्व उपायुक्तांसोबत झालेल्या बैठकीत, त्यांना मागील निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असलेली क्षेत्रे यांची माहिती घेण्यास सांगितले.

Shubman Gill ची साजेशी कामगिरी

सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात गिलने शानदार शतक झळकावले होते. खरं तर हे शतक 12 डावांनंतर त्याच्या बॅटमधून आले. त्याचवेळी तो तिसऱ्या कसोटीतही शतक झळकावण्याच्या तयारीत होता. मात्र, 91 धावांवर तो धावबाद झाला. या मालिकेतील त्याचे दुसरे शतक नऊ धावांनी हुकले.

आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा शुभमन गिल हा दुसरा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 252 धावा केल्या आहेत. त्याचवेळी त्याची सर्वोच्च धावसंख्या 104 आहे. यशस्वी जैस्वाल या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने सलग दोन द्विशतकांच्या मदतीने 545 धावा केल्या आहेत.

News Title- Ahead of the Lok Sabha elections, India’s star batsman Shubman Gill has been made the state icon of Punjab
महत्त्वाच्या बातम्या –

मंदिरावरही लागणार ‘कर’, ‘हिंदूविरोधी’ म्हणत काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली!

IPL फायनलची तारीख ठरली; धोनीच्या गडातून होणार स्पर्धेची सुरूवात!

…तर खेळाडूंना मिळणार 1 कोटी अन् BMW कार; HCA ची मोठी घोषणा

बारामतीच्या राजकारणात आणखी एक पवार, अजित पवारांचं टेंशन वाढणार?

मॉडेलच्या आत्महत्या प्रकरणी ‘हा’ स्टार खेळाडू अडचणीत; ‘तो’ शेवटचा फोन कॉल…