Ajinkya Rahane | मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. अजिंक्य रहाणेने आयपीएल 2024 मधील स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी त्याच्या घरात एक आलिशान गाडी आणली आहे. त्याने मर्सिडीज-मेबॅच जीएलएस कार खरेदी केली आहे, कार खरेदी करतानाचा एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये तो आपल्या पत्नीसोबत कारची चावी घेताना दिसत आहे. रहाणेच्या घरी महागड्या अन् रूबाबदार गाडीचे आगमन झाले आहे.
अजिंक्य रहाणेने Maybach GLS 600 ही कार खरेदी केली आहे, ज्याचा फोटो समोर आला आहे. Mercedes-Maybach GLS 600 ही ऑटोमेकरची सर्वात महागडी कार आहे. तिची किंमत सुमारे 2.88 कोटी रुपये आहे. अजिंक्य रहाणेची मेबॅक जीएलएस पोलर पांढऱ्या रंगात आहे, जी एसयूव्हीसाठी वेगळी निवड आहे. यात एक विशिष्ट क्रोम-आउट ग्रिल, एलईडी हेडलॅम्प आणि 22-इंच अलॉय व्हील आहेत.
रहाणेच्या घरी आली आलिशान कार
अजिंक्य रहाणेने भारतासाठी 85 कसोटी सामने, 90 वन डे सामने आणि 20 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 5077, 2962 आणि 375 धावा केल्या आहेत. तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असला तरी तो आयपीएलमध्ये खेळतो. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा भाग आहे, त्याने आयपीएल 2024 मध्ये चांगली कामगिरी केली.
अजिंक्य रहाणे सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. अलीकडेच त्याच्या नेतृत्वात मुंबईने आसामविरूद्ध सामना खेळला. रहाणे मागील मोठ्या कालावधीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याला भारतीय संघाचे तिकिट मिळाले होते.
Ajinkya Rahane ची नवीन खरेदी
रहाणेची मेबॅक जीएलएस पोलर व्हाईट कलरमध्ये आहे, जी एसयूव्हीसाठी एक अनोखी निवड आहे. ही लक्झरी एसयूव्ही सेलिब्रिटींमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि पांढरा रंग नक्कीच कारला वेगळेपण देतो.
दरम्यान, Mercedes-Maybach GLS 600 मध्ये 4.0-लिटर बाय-टर्बो V8 इंजिन आहे, जे 542 bhp आणि 730 Nm पीक टॉर्क निर्माण करते. सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील दिग्गजांना ही रूबाबदार गाडी आकर्षित करते. अनेक बॉलिवूड कलाकारांकडे ही आलिशान गाडी आहे.
News Title- ajinkya rahane buy Maybach GLS 600 and the price of this car is Rs 2.88 crore
महत्त्वाच्या बातम्या –
लोकसभा निवडणूक: निवडणूक आयोगाने शुभमन गिलवर सोपवली मोठी जबाबदारी!
मंदिरावरही लागणार ‘कर’, ‘हिंदूविरोधी’ म्हणत काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली!
IPL फायनलची तारीख ठरली; धोनीच्या गडातून होणार स्पर्धेची सुरूवात!
…तर खेळाडूंना मिळणार 1 कोटी अन् BMW कार; HCA ची मोठी घोषणा
बारामतीच्या राजकारणात आणखी एक पवार, अजित पवारांचं टेंशन वाढणार?