अजय महाराज बारस्कर यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj jarange patil | गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव लढा देत आहेत. मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. आंदोलन देखील होताना दिसत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे मागणी केली. अशातच या आंदोलनाला आणि उपोषणाला वेगळं वळण मिळालं आहे. मराठा आंदोलक अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केले होते. याबाबत मोठी अपडेट समोर आली. (Manoj jarange patil)

अजय महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांची अक्कल काढली होती. तसेच जरांगे पाटील यांना कोणत्यातरी व्यक्तीचा फोन आल्याचा गंभीर आरोप केला होता. जरांगे यांनी समाजाला वेठीस धरलं असल्याचं वक्तव्य केलं आहे. तसेच त्यांनी बंद खोलीमध्ये बैठका घेतल्या आहेत. त्यामध्ये नेमकं काय घडलं असं सांगावं असं ते म्हणाले. यामुळे आता बारस्कर यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. (Manoj jarange patil)

मनोज जरांगे पाटील यांच्यावर बारस्कर (Manoj jarange patil) यांनी गंभीर आरोप केल्यानं त्यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. त्यांना प्रहार जनशक्ती पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पक्षाविरोधात महाराज बारस्कर यांनी भूमिका घेतल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. बावस्कर यांच्या वक्तव्याशी पक्ष सहमत नसल्याचं बच्चू कडू म्हणालेत.

पक्षाचे कार्याध्यक्ष महेद्र जवंजाळ यांनी बारस्कर यांना पक्षातून बडतर्फ करण्याबाबत माहिती दिली आहे. बारस्कर यांनी केलेल्या विधानाशी पक्ष सहमत नसल्याचं बोललं गेलं आहे. प्रहार जनशक्ती वारकरी समुदाय आणि पक्षाशी कोणताही संबंध राहणार नसल्याचं बोललं जात आहे.

बच्चू कडू यांच्याकडून कडक तंबी

घडलेल्या प्रसंगावरून आता बच्चू कडू यांनी त्यांच्या पक्षाप्रती एक निर्णय घेतला आहे. “मनोज जरांगे पाटील, मराठा नेते आणि मराठा आरक्षणावर कोणीही भाष्य करणार नाही, त्याला पक्षातून काढलं जाईल. त्याचा पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही”, अशा कडक शब्दात बच्चू कडू यांनी तंबी दिली आहे.

काय म्हणाले महाराज बारस्कर?

मनोज जरांगे पाटील यांच्यावर महाराज बारस्कर यांनी टीका केली आहे. बारस्कर यांनी मनोज जरांगे यांची अक्कल काढली आहे. मनोज जरांगेंना अक्कल नाही. त्यांना नीट बोलता येत नाही. कायद्यातील माहिती नाही. ते आता स्वत:ला देव समजू लागले आहेत. त्यांच्यामुळे राज्यामध्ये भुजबळ मोठे होत आहेत, माझा याला विरोध, असल्याचं महाराज बारस्कर म्हणाले आहेत. यामुळे बारस्कर यांना पक्षातून हकलवून लावलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीच्या राजकारणात आणखी एक पवार, अजित पवारांचं टेंशन वाढणार?

मॉडेलच्या आत्महत्या प्रकरणी ‘हा’ स्टार खेळाडू अडचणीत; ‘तो’ शेवटचा फोन कॉल…

‘आरक्षणाची लढाई सोडून द्या, कारण…’; गुणरत्न सदावर्तेंचा मराठा तरुणांना सल्ला

गोल्डनमॅन पंढरीशेठ फडके यांच्या मृत्यूचं कारण आलं समोर!

‘या’ SIP मुळे तुम्हीही व्हाल मालामाल, जाणून घ्या अधिक