MS Dhoni | IPL पूर्वीच धोनीला मोठा धक्का, जवळच्याच मित्राने केला घात; जाणून घ्या नेमकं प्रकरण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MS Dhoni | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MSingh Dhoni) याला मोठा धक्का बसला आहे. धोनीला तब्बल 15 कोटींचा चुना लावला गेला आहे. IPL ची स्पर्धा काही महिन्यांनी येऊन ठेपली असताना धोनीला हा मोठा धक्का बसला आहे. त्याला जवळच्या मित्रानेच गंडवलं आहे. यासंबंधी त्याने रांची येथे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.

MS Dhoni | नेमकं प्रकरण काय?

सदरील प्रकरण हे 2017 मधील असल्याची माहिती मिळत आहे. मिहिर दिवाकर ( Mihir Diwakar) नामक व्यक्तीने महेंद्रसिंग धोनीसोबत 2017 मध्ये जगभरात क्रिकेट अकादमी उघडण्यासाठी करार केला होता. मात्र दिवाकर याने यासाठी करण्यात आलेल्या करारात नमूद केलेल्या अटींचे पालन न केल्यामुळे अरका स्पोर्ट्सला फ्रँचायझी फी भरावी लागली.

हा करार झालेला नफा वाटून घेण्याबाबत होता. मात्र, मिहिर दिवाकरने या नियमांचे कोणतेच पालन न केल्याने त्याच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामुळे धोनीला तब्बल 15 कोटींचं नुकसान झालं आहे.

15 ऑगस्ट 2021 मध्ये धोनीकडून अरका स्पोर्ट्सला अनेक कायदेशीर नोटिसा पाठवण्यात आल्या. मात्र, त्यावर काहीच पाऊल उचलण्यात आलं नाही. यानंतर धोनीचे वकील दयानंद सिंह यांनी अरका स्पोर्ट्सने फसवणूक केल्याचा दावा करत 15 कोटींहून अधिक नुकसान झाले असल्याचं म्हटलं आहे.

IPL मध्ये दिसणार MS Dhoni |

कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी भारताला 3 ICC ट्रॉफी (2007 T20 विश्वचषक, 2011 विश्वचषक, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकून देणारा एकमेव कर्णधार असून त्याने आयपीएलमध्येही 5 ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत. 2023 मध्ये झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात धोनीने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. खरं तर, या सामन्यातच तो निवृत्ती जाहीर करणार होता. मात्र,चाहत्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून अजून एक वर्ष आयपीएल खेळणार असल्याचे त्याने म्हटलं होतं.  त्यामुळे यंदाचा आयपीएल हंगाम धोनीच्या चाहत्यांसाठी खास असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Sharad Pawar | शरद पवारांवर भाजपचा गंभीर आरोप; ‘या’ नेत्याने केली मोठी मागणी

Sharad Mohol | शरद मोहोळच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट समोर!

…म्हणून अमिताभ बच्चन यांनी Aishwarya Rai ला केलं अनफाॅलो, कारण आलं समोर!

IND vs SA | भारताची ‘कसोटी’ संपली अन् ICC कडून खुशखबर; एका दगडात दोन पक्षी

सर्वात मोठी बातमी! पुण्यातील कुख्यात गुंड Sharad Mohol चा गोळीबारात मृत्यू