पुणे | पुण्यातील कुख्यात गुंड Sharad Mohol चा गोळीबारात मृत्यू झाला आहे. पुणे शहरात भरदिवसा गोळीबार झाला होता. या घटनेत शरद मोहोळला तीन गोळ्या लागल्या. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
Sharad Mohol च्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट समोर
शरद मोहोळ हत्येप्रकरणी पहिली दोन नावं समोर आली आहेत. कोळेकर आणि लोंढे ही आरोपींची नावं असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये. शरद मोहोळची हत्या त्याच्या गुन्हेगारी वैमनस्यामधून झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
शरद मोहोळची हत्या करण्यात आली तिकडे सीसीटीव्हीदेखील आहे. हे मारेकरी गल्लीमध्ये दबा धरून बसले होते. गोळ्या झाल्यानंतर आरोपी पसार झाले. मात्र हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी लगेच तपास पथके रवाना करण्यात आली. याबाबत माहिती कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली.
कोण होता Sharad Mohol?
शरद मोहोळ हा पुण्यातील एक गुंड आहे. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गुंड शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्या प्रकरणात त्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. याप्रकरणात तो जामिनावर बाहेर आला.
दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचं अपहरण प्रकरणात त्याला पुन्हा अटक करण्यात आली. जुलै 2022 मध्ये शरद मोहोळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून अमिताभ बच्चन यांनी Aishwarya Rai ला केलं अनफाॅलो, कारण आलं समोर!
IND vs SA | भारताची ‘कसोटी’ संपली अन् ICC कडून खुशखबर; एका दगडात दोन पक्षी
सर्वात मोठी बातमी! पुण्यातील कुख्यात गुंड Sharad Mohol चा गोळीबारात मृत्यू
Mohammed Siraj आणि Jasprit Bumrah यांचा ‘ब्रो-मान्स’, ही दोस्ती तुटायची नाय!
‘कोण कोणामुळे निवडून आलंय…’, Ajit Pawar यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा