Sharad Pawar | शरद पवारांवर भाजपचा गंभीर आरोप; ‘या’ नेत्याने केली मोठी मागणी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीराम हे शाकाहारी नाही तर मांसाहारी असल्याचं वक्तव्य केल्याने नवा वाद सुरू झाला. यामुळे आव्हाड यांना भाजप तसेच राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या रोषालाही सामोरं जावं लागलं आहे. नंतर त्यांनी खेद व्यक्त केला असला तरी, भाजपने हा मुद्दा लावून धरला आहे. आता भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी थेट शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करत थेट त्यांना पत्र पाठवत मोठी मागणी केली आहे.

Sharad Pawar यांना भाजपचं पत्र

आपण देशातील ज्येष्ठ नेते आहात. आपल्या पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाला मांसाहारी आहेत असं म्हटलं. त्यांच्या या राम भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्यावरून देशभर आक्रोश सुरु झाला. अनेक आंदोलने, निदर्शने झाली. संपूर्ण हिंदू समाज पेटून उठला. त्यानंतर त्यांनी माफी मागावी ही अपेक्षा होती. मात्र त्यांनी माफी न मागता उलट प्रभू राम आणि सीता मदिरापाण करत होते, नृत्यांगनाचे नृत्य कसे पाहत होते, अशी प्रभू रामाची चेष्टा करणारे काही कागद दाखवून अजून तीव्र भावना भडकवण्याचा प्रयत्न केला.

आज देशभरातील समस्त संत साधू समाज, करोडो रामभक्त आश्चर्य व्यक्त करत आहेत, की आपण राजकारणात सक्रिय आहातच मात्र देशात घडणारी प्रयेक घटना आपण काळजी पूर्वक त्याची नोंद घेत त्यावर आपली प्रतिक्रिया देता. हा तर प्रचंड गंभीर विषय आहे. समाजाच्या श्रद्धा आणि आस्थेचा गांभीर्याने घेण्याचा विषय असताना सुद्धा आपण मौन का?, असा सवाल आमदार राम कदम यांनी शरद पवार यांना केला आहे.

Sharad Pawar यांना भाजपचा सवाल

भगवान रामाची आव्हाडांनी केलेली चेष्टा तुम्हाला मान्य आहे का? आणि नसेल तर आपण अजून पर्यंत खंडन का केलं नाही?, वास्तविक तुमच्या शब्दा बाहेर आव्हाड जात नाहीत. तुमचे ते निष्ठावत आहेत हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आपण रामभक्ता सोबत आहात की, आव्हाड यांचे समर्थन करत आहात हे देशभरातील संत-साधू समाज आणि हिंदू समाजाला कळलं पाहिजे. अन्यथा, आपलं मौन हे स्पष्ट करेल की हे सर्व काही आपल्याच सांगण्यावरून घडतं आहे. अशा आशयाचं पत्र राम कदम यांनी शरद पवार यांना पाठवलं आहे.

‘राम हा शाकाहारी नसून मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता मग तो शाकाहारी कसा असू शकतो? राम आमचा बहुजनांचा आहे.’, या विधानामुळे जितेंद्र आव्हाड यांना भाजपने चांगलंच घेरलं आहे. आता शरद पवार या पत्राला काय उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Ajit Pawar | अजित पवारांसमोर राडा; भाजप आमदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कानाखाली काढला जाळ

Post Office Scheme l पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये पैसे गुंतवा मिळेल दुप्पट परतावा

Sridevi च्या मृत्यूबद्दल लेक Janhvi Kapoor चा मोठा खुलासा!

IND vs SA | टीम इंडियाने 91 वर्षे जुना विक्रम मोडला; भारतानं रचला इतिहास

Jacqueline Fernandez अडचणीत; सुकेश चंद्रशेखरची पर्सनल चॅट लीक झाल्याने खळबळ