IND vs SA | टीम इंडियाने 91 वर्षे जुना विक्रम मोडला; भारतानं रचला इतिहास

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs SA | टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला नमवून इतिहास रचला आहे. भारतीय संघाला प्रथमच केपटाउन येथे कसोटी सामना जिंकता आला. इतिहासात प्रथमच भारताने केपटाउनमध्ये कसोटी सामना जिंकण्याची किमया साधली. अवघ्या दीड दिवसात संपलेला हा सामना अनेक कारणांनी चर्चेत राहिला. केवळ पाच सत्रांचा सामना म्हणूनही भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने प्रसिद्धी मिळवली. यासह हा सामना कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान सामना ठरला आहे.

दरम्यान, पाच दिवस चालणारा कसोटी सामना केवळ दीड दिवसात संपल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 5 दिवस चालणारे कसोटी सामने हल्ली लवकर संपतात. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात खेळला गेलेला केपटाउन कसोटी सामना केवळ 5 सत्रे चालला अन् भारताने विजय मिळवला. विशेष बाब म्हणजे या सामन्यात केवळ 107 षटके अर्थात 643 चेंडू टाकले गेले.

IND vs SA सामन्यानं रचला इतिहास

सामन्याच्या पहिल्याच दिवशी 23 विकेट पडल्या होत्या. या सामन्यात एकूण 33 विकेट पडल्या, ज्यामधील वीस फलंदाज दक्षिण आफ्रिकेचे होते, तर 13 भारतीय शिलेदार आहेत. या सामन्यापूर्वी सर्वात लहान कसोटी 1932 मध्ये झाली होती, जेव्हा ती ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मेलबर्नमध्ये खेळली गेली होती. त्या सामन्याचा निकाल 656 चेंडूत लागला होता. त्यामुळे हा विक्रम भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने मोडला.

IND vs SA मालिका बरोबरीत

सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 23.2 षटकांचा आणि दुसरा डाव 36.5 षटकांचा राहिला. तर भारतीय संघाने पहिल्या डावात 34.5 षटके फलंदाजी केली. यानंतर दुसऱ्या डावात 12 षटके फलंदाजी करून 7 गडी राखून सामना जिंकला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली गेली. पहिला सामना जिंकून यजमानांनी विजयी सलामी दिली होती. सलामीच्याच सामन्यात पराभव झाल्यामुळे भारताचे मालिका जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. मागील 32 वर्षांमध्ये भारताला एकदाही आफ्रिकेच्या धरतीवर मालिका जिंकता आलेली नाही.

IND vs SA दुसऱ्या सामन्यात भारताचा दबदबा

दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, पहिल्या डावात आफ्रिकेचा संघ केवळ 55 धावांवर सर्वबाद झाला, तर भारतीय संघ पहिल्या डावात 153 धावा करून बाद झाला. दुसऱ्या डावात यजमान संघाने 176 धावा केल्या आणि भारताला 79 धावांचे लक्ष्य दिले, जे टीम इंडियाने सहज गाठले आणि 7 गडी राखून विजय मिळवला.
Winter Driving Tips : दाट धुक्यात गाडी चालवताना या टिप्स फॉलो करा!

Job Alert | पुणे विद्यापीठात नोकरीची संधी; लगेच अर्ज करा

श्रीरामाबद्दल Jitendra Awhad यांचं वादग्रस्त वक्तव्य; उदयनराजेंनी केली मोठी मागणी

IND vs SA | ‘मी फ्लाइट पकडली अन् घरी…’, Sachin Tendulkarनं सांगितला भन्नाट किस्सा

Amir khan ने पहिल्या बायकोसमोर केलं दुसऱ्या बायकोला Kiss; व्हिडीओ तूफान व्हायरल