IND vs SA | ‘मी फ्लाइट पकडली अन् घरी…’, Sachin Tendulkarनं सांगितला भन्नाट किस्सा

Sachin Tendulkar | भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाउन येथे दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान आफ्रिकेने विजयी सलामी दिली. त्यामुळे दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत संपवण्याचे मोठे आव्हान टीम इंडियासमोर आहे. मात्र, दुसऱ्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. एकाच दिवशी 23 बळी गेले अन् दोन्हीही संघाना फलंदाजी आणि गोलंदाजीची संधी मिळाली.

कसोटी सामन्यात असे फार दुर्मिळ पाहायला मिळते, जेव्हा एकाच दिवशी दोन्ही संघाना फलंदाजीची संधी मिळते आणि दोन्हीही संघ सर्वबाद होतात. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाला आपली लय कायम ठेवता आली नाही. मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा बळी घेऊन यजमानांची पळता भुई थोडी केली. सिराजशिवाय मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेऊन दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 55 धावांत सर्वबाद केले.

Sachin Tendulkarनं सांगितला किस्सा

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका या सामन्याचे विश्लेषण करताना अनेक जाणकार मिश्किल टिप्पणी करत आहेत. काहींनी तर गोलंदाजांना खेळपट्टीवरून मदत मिळत असल्याचे नमूद केले. मात्र, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यावर व्यक्त होताना एक भन्नाट किस्सा सांगितला. केपटाउन कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आपला अनुभव शेअर करताना सचिनने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

Sachin Tendulkar ही झाला शॉक

सचिनने म्हटले, “24 (वर्ष 2024) मध्ये क्रिकेटची सुरुवात अशा प्रकारे झाली आहे की एकाच दिवसात 23 विकेट पडल्या आहेत. हे अवास्तव वाटते… जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वबाद झाला तेव्हा मी फ्लाइट पकडली आणि आता मी घरी आहे, टीव्ही पाहतो तर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 3 गडी गमावले आहेत. मी काय मिस केलं?”

खरं तर मास्टर ब्लास्टरने तो मुंबईत कुठून परतत होता हे लिहिलेले नाही. पण या पोस्टमध्ये त्याची उणीव जाणवली ती म्हणजे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 55 धावांत सर्वबाद केल्यानंतर तोच भारतीय संघ 153 धावांत आटोपला.

IND vs SA सामन्याचा थरार

पहिल्या दिवसअखेर दोन्हीही संघ समान स्थितीत आहेत. कारण भारतीय संघाला आपल्या पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली नाही, त्यामुळे केवळ 98 धावांची आघाडी घेतला आली. टीम इंडियाने पहिल्या डावात 98 धावांची आघाडी घेतली. दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावात ६२ धावा केल्या आणि तीन गडी गमावले आहेत. भारत अद्याप 36 धावांनी पुढे आहे.

work out in winter : हिवाळ्यात व्यायाम करताना ‘या’ गोष्टींची काळजी घेणे आवश्यक

Virat Kohli आणि शुबमन गिलची भर मैदानात ‘फुगडी’, पाहा Video

Two-Wheeler Launches In January 2024 | दमदार आणि आकर्षक फीचर्ससह या महिन्यात लाँच होणार या 4 बाईक्स

Jitendra Awhad | ‘एवढी वर्ष जंगलात राहून…’; श्रीरामाबद्दल जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य

Virat Kohli | ‘राम सिया राम’…; भरमैदानात किंग कोहली रामलल्लांच्या भक्तीत तल्लीन