Virat Kohli | ‘राम सिया राम’…; भरमैदानात किंग कोहली रामलल्लांच्या भक्तीत तल्लीन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Virat Kohli | केपटाउन येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA Test) यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. दोन्हीही संघांना फलंदाजीची संधी मिळाली अन् एकाच दिवशी 23 बळी गेले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमान दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 55 धावात आटोपला. अखेरचा कसोटी सामना न्यूलँड्स, केपटाऊन इथं पार पडत आहे.

Virat Kohli रामलल्लांच्या भक्तीत तल्लीन

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli Viral Video) एका कृत्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. बुधवारी, सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं भगवान श्रीरामाला अनोख्या पद्धतीने नमन केल्याचं दिसलं. सामन्यादरम्यान डीजेनं ‘राम सिया राम’ हे भक्तिगीत वाजवलं अन् विराट थिरकला. किंग कोहलीनं हातवारे करत काल्पनिक धनुष्याची तार ओढली आणि नंतर हात जोडून नमस्कार केला. विराटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Virat Kohli ने मैदानात जोडले हाथ

दरम्यान, पहिल्या सामन्यात दारूण पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन केलं. मोहम्मद सिराजनं अप्रतिम गोलंदाजी करून यजमानांना चीतपट केलं. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात आफ्रिकेचा खेळाडू केशव महाराज फलंदाजीला आला तेव्हा विराटनं ठेका धरला, ज्याची डावापेक्षा जास्त चर्चा रंगली. केपटाउनच्या मैदानात डीजेनं ‘राम सिया राम’ हे भक्तिगीत वाजवलं. यानंतर विराट कोहलीनं भगवान रामाला स्मरण करत हात जोडले आणि नंतर काल्पनिक धनुष्याची तार ओढत चाहत्यांची मनं जिंकली.

विराट कोहलीची गणना दिग्गजांमध्ये केली जाते. क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. मागील वर्षी पार पडलेल्या वन डे विश्वचषकात त्यानंं वन डेतील शतकांचे अर्धशतक ठोकले. किंग कोहली मैदानावर नेहमी सक्रिय असतो. अनेकवेळा तो नृत्य, हातवारेकरून उपस्थित चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसला आहे. कोहलीचा भगवान श्रीरामाच्या गाण्यावर ठेका धरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहत्यांनी कोहलीच्या या अनोख्या शैलीचं कौतुक केलं.

Virat Kohli ची सर्वाधिक खेळी

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर सामना बरोबरीत आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण भारतीय गोलंदाजांनी घातक गोलंदाजी करून आफ्रिकेला अवघ्या 55 धावांत गुंडाळलं. पण, भारताला देखील आपल्या पहिल्या डावात काही खास कामगिरी करता आली नाही. भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 153 धावा केल्या आणि 102 धावांची आघाडी घेतली होती. खरं तर भारताकडून विराट कोहली (46) वगळता एकाही खेळाडूला खेळपट्टीवर जास्त काळ टिकता आलं नाही. विशेष बाब म्हणजे भारताचे सात फलंदाज खातेही न उघडता तंबूत परतले. पहिल्या दिवसअखेर यजमानांनी आपल्या दुसऱ्या डावात 3 बाद 62 धावा केल्या.

IND vs SA दुसऱ्या सामन्यासाठी भारताचे 11 शिलेदार –

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि मुकेश कुमार.

Petrol Diesel Price | पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार?, पेट्रोलियम मंत्रालयानं दिली सर्वात मोठी माहिती

‘…तो दारु पिऊन धिंगाणा घालायचा, शिवाय शारीरिक…’; Aishwarya Rai ने केला मोठा गौप्यस्फोट

Health Update | शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासतेय?; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Shreyas Talpade | “मी तर मेलो होतो, हा माझा दुसरा जन्म”, श्रेयस तळपदेनं सांगितली धक्कादायक आपबीती

Jheel Mehta | TMKOC फेम ‘सोनूला’ अखेर मिळाला रियल लाईफ टप्पू; लवकरच अडकणार लग्नबंधनात