Health Update | शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासतेय?; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Health Update | आजकालच्या तरुणाईला फास्ट फूड खाणे जास्त आवडते. मात्र फास्ट फूडचे सेवन केल्याने शरीरावर जास्त प्रमाणात दुष्परिणाम होतात आणि याचमुळे आजारांच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवतात. अशातच एक सर्वात मोठी समस्या म्हणजे शरीरामध्ये (Health Update) हिमोग्लोबिनची कमतरता भासणे ही आहे. शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झाल्यास व्यक्तीची सतत चिडचिड होणे, थकवा जाणवणे आणि जास्त प्रमाणात अशक्तपणा जाणवतो.

Health Update l शरीरातील अशक्तपणाची सुरुवातीची लक्षणे  

शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक लक्षणे दिसतात. यामध्ये मुख्यतः हाताला आणि पायाला मुंग्या येणे हे लक्षण आहे. अशावेळी रक्तदाब कमी झाल्यास ऑक्सिजन शरीरातील रक्तवाहिन्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. अशा स्थितीत हात-पायांमध्ये मुंग्या येणे सुरू होते. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता असल्यास चक्कर येते.

याशिवाय शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी झाल्यास केस गळणे, सतत तोंड येणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, व चेहरा पिवळसर दिसणे असे लक्षणे जाणवतात. जर अशी लक्षणे दिसून यायला सुरवात झाली कि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

Health Update | शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झाल्यास या पदार्थांचे सेवन करा

डाळिंब : शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाल्यास डाळिंबाचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. कारण डाळिंबामध्ये अ‍ॅटिऑक्सीडेंट्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे अ‍ॅनिमिया, कॅन्सर यांसारख्या आजारांपासून सुटका होऊ शकते.

सफरचंद : शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासत असल्यास नियमित सफरचंद या फळाचे सेवन करावे. सफरचंदाचे सेवन केल्यास डायबिटीज, अ‍ॅनिमिया आणि हार्ट संबंधित आजार बरे होतात. या फळामध्ये फायबर आणि फ्लेवेनॉअ‍ॅड्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरासाठी ते चांगले असते.

टरबूज : आरोय तंदुरुस्त ठेवण्यासाठी शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. अशावेळी तुम्ही टरबूज या फळाचे सेवन करू शकता. टरबूजमध्ये लायकोपिन असल्याने ते हार्ट संबंधित आजारांपासून सुटका करतात. तसेच टरबुजाची सेवन केल्यास पचनक्रिया देखील सुधारते. त्यामुळे निरोगी शरीरासाठी (Health Updates) प्रथिने, जीवनसत्त्वे आणि पोषक तत्त्वे या सर्वांची मुबलक प्रमाणात आवश्यकता असणे गरजेचे असते.

महत्वाच्या बातम्या :

Jheel Mehta | TMKOC फेम ‘सोनूला’ अखेर मिळाला रियल लाईफ टप्पू; लवकरच अडकणार लग्नबंधनात

Entertainment News | तुमच्या अंगावर काटा आणतील ‘या’ 3 थ्रिलर वेब सिरीज, नक्की पाहा

…म्हणून Aishwarya Rai ने अभिषेकचं घरं सोडलं?; व्हिडीओमुळे अखेर सत्य समोर

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबद्दल सयाजी शिंदे यांचं मोठं वक्तव्य!

Jayant Patil | राष्ट्रवादीच्या शिबिराला ‘या’ नेत्याची दांडी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण