Maratha Reservation | मराठा आरक्षणाबद्दल सयाजी शिंदे यांचं मोठं वक्तव्य!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात अनेक ठिकाणी उपोषणं झाली. मनोज जरांगे पाटील हे कुणबी मराठा समाजातील बांधवांना सरसकट आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहेत. अशात आता या लढ्याला दिग्गज अभिनेत्यानं पाठिंबा दिला आहे. अंतरवाली सराटी येथे अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

Maratha Reservation | आरक्षणाबद्दल सयाजी शिंदेंचं मोठं वक्तव्य

जरांगेंची भेट घेतल्यानंतर सयाजी शिंदे यांनी मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) मोठं वक्तव्य केलं आहे. सयाजी शिंदे यांनी मराठा आरक्षणाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. या आरक्षणाच्या मागणीला माझा पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलंय.

मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. कोणीतरी आवाज उठवणं गरजेचं होतं आणि तो आवाज जरांगे पाटील यांनी उठवला आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो, असं सयाजी शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या व्यक्तीने ‘न भूतो न भविष्यती’ असं कार्य आरंभलं आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी ही भेट घेतली आहे. माझ्यात आणि जरांगे पाटील यांच्यात काही चर्चा झाली नाही. कारण मी काही अभ्यासक नाही. मी फक्त इथे आलो, त्यांना भेटलो आणि चहापाणी घेतलं, असंही शिंदेंनी स्पष्ट केलं.

राज्यभरात 54 लाख मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे सध्या सर्वांचीच परीक्षा सुरू आहे. जरांगे पाटील या परीक्षेत उत्तम आहेत. त्यामुळे राजकारण्यांचीही परीक्षा सुरू आहे. मराठा समाजातील विद्यार्थी आणि तरुण यांचा विचार केलाच पाहिजे, असं सयाजी शिंदे म्हणाले.

Maratha Reservation | जरांगे पाटील मुंबईत येणार?

दरम्यान, मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे थेट आता मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहे. येत्या 20 जानेवारीला मनोज जरांगे पाटील मराठ्यांसह मुंबईत येणार असून ते आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

Sayaji Shinde’s big statement about Maratha reservation

महत्त्वाच्या बातम्या- 

Adani Group | हिंडनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा अदानींना मोठा दिलासा!

Munawar Faruqui | ‘त्याला पोरींसोबत…’; अंजली अरोराचा मुनव्वर फारुकीवर गंभीर आरोप

Ramdas Athawale | “अयोध्येत राम मंदीर किंवा बाबरी मशीद नव्हती, तर”; रामदास आठवलेंचा खळबळजनक दावा

Mahanand Dairy | महाराष्ट्रासाठी धक्कादायक बातमी; आणखी एक व्यवसाय गुजरातकडे?

Aishwarya Rai Bachchan | घटस्फोटाच्या चर्चेनंतर अभिषेक पहिल्यांदाच बोलला, म्हणाला…