Mahanand Dairy | महाराष्ट्रासाठी धक्कादायक बातमी; आणखी एक व्यवसाय गुजरातकडे?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mahanand Dairy | राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर अनेक प्रकल्प हे एकापाठोपाठ एक गुजरातमध्ये गेले. यामुळे विरोधकांनी राज्यातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाण्यावर महायुती सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हळूहळू गुजरातकडे चालल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होताना दिसत आहे.

आता राज्यातील आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दुग्ध व्यवसायही (Mahanand Dairy) राज्याबाहेर जात असल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेने केला आहे.

महानंदचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हा महानंद डेअरी (Mahanand Dairy) प्रकल्प राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे सोपवण्यात येणार असल्याची घोषणा मागील वर्षी मार्च महिन्यात सरकारने विधानसभेत केली होती. त्यानंतर आता यावर कार्यवाही सुरू झाली आहे.

राज्यातील दुध उत्पादक शेतकरी अडचणीत असताना दुसरीकडे गुजरात आणि केंद्राच्या राज्यकर्त्यांना राज्यातील दुग्ध व्यवसाय बहाल करण्याचा महाराष्ट्राचे राज्यकर्ते करत असल्याचा आरोप डॉ. अजित नवले यांनी केला.

राज्य सरकारने सहकाराला चालना द्यावी, महानंद (Mahanand Dairy) हा ब्रॅण्ड राज्य सरकारनेच विकसित करावा अशी मागणी देखील अखिल भारतीय किसान सभेने केली आहे.

Mahanand Dairy अडचणीत

सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या महानंद डेअरीबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. महानंद डेअरी एनडीडीबीला चालवायला देणार असल्याची माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. विधानसभेत त्यांनी ही माहिती दिली होती.

दुसरीकडे, महानंद डेअरीची (Mahanand Dairy) सध्या आर्थिक स्थिती अडचणीची असल्याने कामगारांचे पगार देण्यासाठीही पैसे नसल्याचं समोर आलं आहे. ‘महानंद’चे दूध संकलन एकेकळी 2005 मध्ये आठ लाख लिटरच्या आसपास होते. ते सध्या केवळ 25 ते 30 हजार लिटरवर आलं आहे. नफ्यातील घट वाढत जाऊन तो आता 15 कोटींवर जाऊन पोहोचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Aishwarya Rai Bachchan | घटस्फोटाच्या चर्चेनंतर अभिषेक पहिल्यांदाच बोलला, म्हणाला…

Rohit Sharma | रोहित शर्मा मोठा निर्णय घेण्याची शक्यता, वर्षाच्या सुरुवातीला देणार धक्का!

Rohit Sharma | …अखेर रोहित शर्मानं दिला होकार!, BCCI लवकरच जाहीर करणार गुडन्यूज

Congress | निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सर्वात मोठा धक्का?

Aishwarya Rai च्या ‘या’ चुका ठरू शकतात घटस्फोटाचं कारण!