Ramdas Athawale | “अयोध्येत राम मंदीर किंवा बाबरी मशीद नव्हती, तर”; रामदास आठवलेंचा खळबळजनक दावा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ramdas Athawale | अयोध्येत राम मंदिराचं काम आता अंतिम टप्प्यात आलं असून 22 जानेवारीला राम मंदिराचं (Ram Mandir) उद्घाटन होणार आहे. भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.

Ramdas Athawale यांचा खळबळजनक दावा

राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरात विविध पद्धतीने तयारीही सुरु आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक दावा केला आहे. अयोध्येत राम मंदिराच्या जागी आधी गौतम बुद्ध मंदिर होतं, असा दावा रामदास आठवलेंनी केला आहे.

अयोध्येत जिथे राम मंदिर आहे तिथे बुद्ध मंदिर होतं. उत्खनन केलं तर ही बाब समोर येईल. मात्र बाबरी मशिद आणि राम मंदिर यांच्या वादात तिसऱ्याने पडू नये म्हणून आम्ही शांत आहोत, असं आठवलेंनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडालीये.

राम मंदिर आहे तिथे बुद्ध मंदिर असल्याचे पुरावे आहेत. उत्खननात बुद्ध मंदिराचे अवशेष सापडले आहेत. अडीच हजार वर्षे या गोष्टीला झाली. त्यानंतर राम मंदिर त्या ठिकाणी आलं, असा दावा रामदास आठवलेंनी केला आहे.

अयोध्येत गौतम बुद्धांचं मंदिर व्हावं यासाठी आपण प्रयत्न करु, असंही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. एकीकडे
राम मंदिराचं उद्घाटन होत असताना दुसरीकडे आठवलेंनी हे वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

22 जानेवारीला होणार राम मंदिराचं उद्घाटन

मागच्या कित्येक वर्षांपासून रामभक्त ज्या दिवसाची वाट पाहात होते. तो क्षण जवळ येतो आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत मोठा सोहळा होतो आहे. या दिवशी राम मंदिराचं (Ram Mandir) उद्घाटन होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Mahanand Dairy | महाराष्ट्रासाठी धक्कादायक बातमी; आणखी एक व्यवसाय गुजरातकडे?

Aishwarya Rai Bachchan | घटस्फोटाच्या चर्चेनंतर अभिषेक पहिल्यांदाच बोलला, म्हणाला…

Rohit Sharma | रोहित शर्मा मोठा निर्णय घेण्याची शक्यता, वर्षाच्या सुरुवातीला देणार धक्का!

Rohit Sharma | …अखेर रोहित शर्मानं दिला होकार!, BCCI लवकरच जाहीर करणार गुडन्यूज

Congress | निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सर्वात मोठा धक्का?