Congress | निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सर्वात मोठा धक्का?

Congress | लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. सगळेच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र त्याआधी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडणार असल्याचं दिसतंय. निवडणुकीआधी फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता आहे. अशात शिंदे गटाच्या नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ माजली आहे.

Congress ला सर्वात मोठा धक्का?

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे बडे नेते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली आहे.

“Congress चे 9 बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात”

काँग्रेसचे (Congress) 9 बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून ते धनुष्यबाणावर लढण्यास इच्छुक असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामतांनी केलाय. मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या या दाव्याने काँग्रेसची मात्र झोप उडाली आहे.

पक्षांतरावरुन भाजप आणि ठाकरे गटामध्ये चांगलीच जुंपलीय. काँग्रेसमधले अनेक जण भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. काँग्रेसमधल्या अनेक लोकांना भाजपात येण्याची इच्छा असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय.

विखे पाटलांना संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केलीये. उद्या भाजपकडे सत्ता नसेल तेव्हा ते कुठे असतील हा त्यांनी विचार करावा, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Aishwarya Rai च्या ‘या’ चुका ठरू शकतात घटस्फोटाचं कारण!

Kamal Pardeshi | अंबिका मसाला जगभर पोहोचवणाऱ्या कमल परदेशींचं निधन!

Post Office | पोस्टाची जबरदस्त योजना; म्हातारपण जाईल आरामात

Gautami Patil | गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर!

Business Loan | व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देतं ‘इतके’ लाख रूपये, असा करा अर्ज