Post Office | अनेक लोक गुंतवणुकीचे असे मार्ग शोधतात जिथे त्यांना खात्रीशीर परतावा मिळू शकेल. Post Office योजनेत तुम्हाला बचतीवर सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळतो. तुम्हाला पोस्ट ऑफिसमधून (Post Office) मोठी कमाई करायची असेल, तर पोस्टाने तुमच्या कमाईसाठी चांगली संधी आणली आहे.
Post Office ची जबरदस्त योजना
आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या एका अतिशय फायदेशीर योजनेबद्दल सांगणार आहोत. पोस्ट ऑफिस योजनेत गॅरंटीड परताव्याचा आकडा बहुतेक बँकांच्या एफडीपेक्षा जास्त आहे. अशीच एक बचत योजना म्हणजे मासिक उत्पन्न योजना, ज्यामध्ये एकरकमी ठेवीवर दरमहा उत्पन्न मिळतं.
Post Office | मासिक उत्पन्न योजना
Post Office च्या या योजनेत तुम्ही सिंगल खात्यात 9 लाख रुपये आणि जॉईंट खात्यात 15 लाख रुपये जमा करू शकता. तुमची इच्छा असल्यास, तुमची एकूण मूळ रक्कम 5 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर परत केली जाईल.
मॅच्युरिटी कालावधी आणखी 5-5 वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो. दर 5 वर्षांनी, मूळ रक्कम काढण्याचा किंवा योजनेला मुदतवाढ देण्याचा पर्याय असेल. खात्यावर मिळणारे व्याज दर महिन्याला पोस्ट ऑफिस बचत खात्यात भरले जाते. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेतील गुंतवणुकीवर टीडीएस कापला जात नाही. मात्र, तुमच्या हातात येणारे व्याज करपात्र असते.
पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग्ज स्कीममध्ये मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढण्याची गरज असल्यास, तुम्हाला ही सुविधा एका वर्षानंतर मिळते, परंतु त्यापूर्वी रक्कम काढायची असेल तर ते शक्य नाही.
प्री-मॅच्युअर क्लोजरच्या बाबतीतही तुम्हाला दंड भरावा लागेल. जर तुम्ही 1 ते 3 वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर ठेव रकमेपैकी 2% रक्कम वजा केल्यावर परत मिळतं.
या योजनेत जास्तीत जास्त 9 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. तसेच तुम्हाला दरमहा 5,500 रुपये मिळतील.
गुंतवणूक- 9 लाख रुपये
वार्षिक व्याज दर- 7.4%
कालावधी: 5 वर्षे
व्याजातून कमाई- रु. 3,33,000
मासिक उत्पन्न- रु 5,550
महत्त्वाच्या बातम्या-
Gautami Patil | गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर!
Business Loan | व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देतं ‘इतके’ लाख रूपये, असा करा अर्ज
Farmer | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सरकारने घेतला मोठा निर्णय
Janhvi Kapoor चा बॉयफ्रेंडबाबत मोठा खुलासा; भर कार्यक्रमात घेतलं नाव, पाहा व्हिडीओ
Disha Salian | दिशा सालियानविषयी अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा!