Business Loan | व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देतं ‘इतके’ लाख रूपये, असा करा अर्ज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Business Loan | तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. व्यवसाय करायचा म्हटलं की त्यासाठी भांडवल लागतंच. भांडवल आणायचं कुठून? हा पहिला मोठा प्रश्न व्यवसाय सुरू करण्याआधी सर्वांपुढे उभा राहतो. पण तुम्हाला माहितीये का? सरकारच्या योजनेद्वारे तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी (Business Loan) सहज पैसे मिळू शकतात.

Business Loan | सरकार देतं कर्ज

तुम्ही जर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर काळजी करण्याचं कारण नाही. महाराष्ट्र सरकारच्या खास योजनेद्वारे तुम्हाला व्यवसायासाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळू शकतं. महाराष्ट्र सरकारद्वारे तरूणांना व्यवसायासाठी आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने थेट कर्ज योजना राबविली जाते.

महाराष्ट्र सरकारद्वारे तरूणांना व्यवसायासाठी आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने थेट कर्ज योजना राबवली जाते. राज्य सरकारद्वारे राबवली जाणारी ही योजना नक्की काय आहे व यांतर्गत व्यवसायासाठी कर्ज कसे मिळेल? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Business Loan | थेट कर्ज योजना काय आहे?

थेट कर्ज योजनेंतर्गत 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. या कर्जामध्ये 5 हजार रुपयांचा वाटा हा अर्जदाराचा असतो. तर 85 हजार रुपये हे महामंडळाद्वारे दिले जातात व उर्वरित 10 हजार रुपये हे अनुदान स्वरुपात मिळतात.

अर्जदारास कर्जाची रक्कम ही 4 टक्के व्याजदराने दिली जाते. तसेच, लक्षात घ्या की या कर्जाचा कालावधी हा 3 वर्ष आहे. म्हणजेच अर्जदार 3 वर्षांच्या आत मासिक हफ्त्याने कर्ज फेडावे लागते.

आवश्यक कागदपत्रे  

जातीचा दाखला, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, वीज बिल, आणि रेशन कार्ड

असा करा अर्ज- 

https://mpbcdc.maharashtra.gov.in/Site/1525/Direct-Finance-Scheme

महत्त्वाच्या बातम्या- 

Farmer | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सरकारने घेतला मोठा निर्णय

Janhvi Kapoor चा बॉयफ्रेंडबाबत मोठा खुलासा; भर कार्यक्रमात घेतलं नाव, पाहा व्हिडीओ

Disha Salian | दिशा सालियानविषयी अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा!

Maharashtra Politics | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!

Aishwarya Rai-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय!