Farmer | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सरकारने घेतला मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राज्य सरकारने शेतकऱ्यांना (Farmer) दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे  पीक नुकसान झाल्यानंतर मदतीची मर्यादा वाढवली सरकारने वाढवली आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) दिलासा मिळणार आहे.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निकषापेक्षा जास्त मदतीचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे. शासनाने एसडीआरएफ नियमात बदल करून प्रति हेक्टर मदत वाढण्याचा आदेश काढला आहे.

Farmer | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

जर तुमची जमीन बागायतीसाठी वापरली जात असेल तर, पीक नुकसान झाल्यास सरकार तुम्हाला भरपाई देईल. बागायती पिकांच्या नुकसानीसाठी सुरुवातीला हेक्टरी 17 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. मात्र, आता ही भरपाई वाढवण्यात आली असून, सरकार हेक्टरी 27 हजार रुपये देणार आहे. ही भरपाई तीन हेक्टरपर्यंत लागू असेल.

जर तुम्ही जिरायती जमिनीवर पिकांची लागवड केली असेल तर अवकाळी पावसामुळे पिकांवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला सरकारकडून आर्थिक मदत मिळेल. पूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी 8,000 रुपये मिळत होते, मात्र आता 13,500 पर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. ही भरपाई जास्तीत जास्त दोन हेक्टर क्षेत्रासाठी लागू असेल.

बारमाही पिकाचे नुकसान झाले असेल तर यापूर्वी सरकार हेक्टरी 22 हजार 500 रुपये मदत देत होते, मात्र आता ते 36 हजार रुपये प्रति हेक्टर करण्यात आले आहे. ही मदत 3 हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी दिली जाईल.

Farmer | पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती 

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना (Farmer) मोठा दिलासा मिळाला आहे. कारण राज्यातील पीक कर्ज वसुलीसाठी महसूल विभागाकडून स्थगिती दिलीये. दुष्काळ आणि दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्ये तसेच इतर तालुक्यांमधील 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. पण आता या भागातील पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

Janhvi Kapoor चा बॉयफ्रेंडबाबत मोठा खुलासा; भर कार्यक्रमात घेतलं नाव, पाहा व्हिडीओ

Disha Salian | दिशा सालियानविषयी अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा!

Maharashtra Politics | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!

Aishwarya Rai-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय!

Kasganj News | ‘थंडीचा त्रास होतोय, मला बायको हवीये…’; तरूणाने थेट पोलीस स्टेशन गाठलं