Kasganj News | ‘थंडीचा त्रास होतोय, मला बायको हवीये…’; तरूणाने थेट पोलीस स्टेशन गाठलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kasganj News | उत्तर प्रदेशसह देशभरात सध्या कडाक्याची थंडी आहे. परिस्थिती अशी आहे की घरातून बाहेर पडणं कठीण झालं आहे. लोकांना घरात ब्लॅंकेट घेऊन झोपून राहायला आवडतं. उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये (Kasganj News) थंडीच्या त्रासामुळे एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे.

इथे एका तरुणाने विचित्र तक्रार घेऊन थेट पोलीस ठाणे गाठलंय. पोलिसांनी तक्रार वाचताच त्यांना हसू आवरता आलं नाही, मात्र नंतर प्रकरणाचं गांभीर्य समजून त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं.

Kasganj News | नेमकं प्रकरण काय?

हे प्रकरण अमनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावचं आहे. गावातील रहिवासी नीरजने शनिवारी पोलिस स्टेशन  गाठलं. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली, जी वाचून पोलिसही हसले. पत्नीसाठी अर्ज. यानंतर लिहिलं होतं की सर, कृपया मला पत्नी मिळवून द्या. थंडीने त्रास होतोय. तसेच याशिवाय मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांचं म्हणणं पोहोचवण्याची विनंती देखील त्याने केली.

त्याचं कुटुंब आणि नातेवाईक त्याचं लग्न करू देत नसल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे तो नाराज आहे. जर त्याला पत्नी असेल तर तो आनंदाने जगू शकेल. पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबीयांना बोलावलं. घरच्यांना विचारण्यात आलं की तुम्ही त्याचं लग्न का करत नाही? त्यावर कुटुंबीयांनी तो मानसिक अस्वस्थ असल्याचं सांगितलं.

नीरज नावाचा तरुण लग्नासाठी तक्रार घेऊन आला होता. त्याच्या कुटुंबीयांना बोलावून त्याला घरी पाठवण्यात आले आहे. तो बऱ्याच दिवसांपासून मानसिक आजारी होता. यामुळे तो लग्न करू शकत नाही, असं पोलिसांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

Weather Update | ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

‘या’ बड्या खेळाडूचा चाहत्यांना धक्का; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Central government employees | नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Gold Price Today | वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

LPG Price Today | नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी गुड न्यूज!