Central government employees | नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Central government employees | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवातच धमाकेदार ठरली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात याहूनही मोठी भेटवस्तू मिळणार आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांचा महागाई भत्ता 50 टक्के निश्चित झाला आहे.

Central government employee साठी आनंदाची बातमी

केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात (Central government employees) वाढीची भेट मिळणार आहे. मात्र, यासाठी मार्च 2024 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. जुलै ते डिसेंबर 2023 या कालावधीतील AICPI निर्देशांकांनी पुष्टी केली आहे की आता किमान केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळेल.

Central government employees

नोव्हेंबर AICPI निर्देशांक क्रमांक आले आहेत. डिसेंबरचे आकडे अद्याप बाकी आहेत. महागाई भत्त्यात आतापर्यंत 4 टक्के वाढ झाली आहे. सध्याचा DA दर 46 टक्के आहे, जर आपण AICPI डेटावर नजर टाकली तर, महागाई भत्त्याचा स्कोअर 49.68 टक्के झाला आहे. निर्देशांक सध्या 139.1 अंकांवर आहे.

दुसरी भेट प्रवास भत्त्याच्या स्वरूपात असेल. डीए वाढल्याने प्रवास भत्ता (TA) मध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, प्रवास भत्ता पे बँडशी जोडल्यास, डीएमध्ये वाढ आणखी वाढू शकते.

प्रवास भत्ता वेगवेगळ्या पे बँडशी जोडलेला आहे. उच्च टीपीटीए शहरांमध्ये, ग्रेड 1 ते 2 साठी प्रवास भत्ता रुपये 1800 आणि 1900 रुपये आहे. ग्रेड 3 ते 8 ला 3600 रुपये + DA मिळते. तर, इतर ठिकाणी हा दर रु 1800 + DA आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Gold Price Today | वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

LPG Price Today | नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी गुड न्यूज!

Tom Wilkinson | मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतला जगाचा निरोप

Tea | सकाळ संध्याकाळ चहा पिणं सोडा, फक्त एवढ्या दिवसात बनाल करोडपती!

Jalgaon: सासरा लोकसभेच्या मैदानात… सुनेनंही घेतली नाही माघार; म्हणाली, “मला संधी दिली तर…”