David Warner ने आपल्या चाहत्यांना दिला धक्का; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner)  चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याने कसोटीनंतर एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकतो,  असंही वॉर्नरने म्हटलं आहे.

David Warner चा चाहत्यांना धक्का

डेव्हिड वॉर्नरने (David Warner) यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. सिडनी येथे 3 जानेवारीपासून पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळल्यानंतर तो या फॉरमॅटला अलविदा करेल. कसोटीसोबतच तो त्याच दिवशी एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्त होणार आहे.

डेव्हिड वॉर्नरने (David Warner) टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो  जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20  विश्वचषकात खेळण्याची आशा आहे.

पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर तो सिडनी थंडरसाठी किमान चार सामने खेळणार आहे. यानंतर तो ILT20 मध्ये दुबई कॅपिटल्सकडून खेळू शकतो. ILT20 लीगमध्ये खेळण्यासाठी तो क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून NOC मागत आहे, ज्यामध्ये दुबई संघाचा पहिला सामना 21 जानेवारी रोजी होणार आहे.

डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियन संघासोबत 2015 आणि 2023 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. तो ऑस्ट्रेलियन संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे आणि त्याने संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत.

डेव्हिड वॉर्नरने 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये 2 शतके आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने 500 हून अधिक धावा केल्या होत्या. वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Central government employees | नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Gold Price Today | वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

LPG Price Today | नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी गुड न्यूज!

Tom Wilkinson | मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतला जगाचा निरोप

Tea | सकाळ संध्याकाळ चहा पिणं सोडा, फक्त एवढ्या दिवसात बनाल करोडपती!