LPG Price Today | नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी गुड न्यूज!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

LPG Price | नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लोकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या सुरवातीला LPG सिलिंडरच्या किमतीत कपात करून ग्राहकांना नवीन वर्षांचे गिफ्ट दिलं आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. यापूर्वी 22 डिसेंबर 2023 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीही कमी करण्यात आल्या होत्या.

LPG Price Today | नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी गुड न्यूज

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने 19 किलो गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. मात्र, स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

LPG Price Today | सिलेंडरच्या किमती घसरल्या

दिल्लीत व्यावसायिक एलपीजीची किंमत 1. 50  रुपयांनी कमी झाली आहे. किमतीत कपात झाल्यानंतर राजधानी दिल्लीत व्यावसायिक एलपीजीची किंमत 1755. 50 रुपये झाली आहे.

मुंबईत 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 1710 रुपयांवरून 1708.50 रुपयांवर पोहोचली आहे. तसेच चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत 1929 रुपयांवरून 1924 .50  रुपयांवर घसरली आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या असून घरगुती गॅस सिलिंडरच्या ग्राहकांनाकोणताही दिलासा मिळाला नाही. घरगुती सिलिंडरच्या दरांमध्ये शेवटची मोठी कपात 20 ऑगस्ट 2023 रोजी झाली होती आणि सिलिंडरच्या किमती 1103 रुपयांवरून 903 रुपयांवर म्हणजे तब्बल 200 रुपयांनी स्वस्त झाला होता. आज घरगुती सिलिंडरची किंमत मुंबईत 902. 50 रुपये आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Tom Wilkinson | मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतला जगाचा निरोप

Tea | सकाळ संध्याकाळ चहा पिणं सोडा, फक्त एवढ्या दिवसात बनाल करोडपती!

Jalgaon: सासरा लोकसभेच्या मैदानात… सुनेनंही घेतली नाही माघार; म्हणाली, “मला संधी दिली तर…”

Pune News | पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते असणार बंद… मनस्ताप टाळायचा असेल तर आत्ताच वाचा

Asha Negi | ‘निर्मात्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर…’; ‘या’ अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ