मुंबई | प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आशा नेगीने (Asha Negi) ‘पवित्र रिश्ता’ द्वारे तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आशा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी आशा नेगी तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली होती. अलीकडेच आशा नेगी तिच्या एका व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये Aasha Negi टीव्ही इंडस्ट्रीतील लोकांच्या विचारांवर टीका करताना दिसत आहे.
Asha Negi च्या वक्तव्याने खळबळ
आशा नेगीचा हा व्हिडीओ जेनेलिया डिसूजा आणि रितेश देशमुख यांच्या शोमधला आहे, ज्यामध्ये त्यांच्यासोबत करण कुंद्रा आणि प्रिन्स नरुला देखील उपस्थित होते.
View this post on Instagram
नेमकं काय म्हणाली Asha Negi ?
जर एखादी मुलगी पटकन यशस्वी होते. जरी ती तिच्या टॅलेंटमुळे यशस्वी झाली, तरी लोकांना वाटतं की तिने बॉस किंवा निर्मात्यासोबत शारीरिक संबंध ठेवले असतील. त्यामुळे तिला हा दर्जा मिळत नाही. ते साध्य झालं आहे आणि हे काम झालं आहे. व्हिडीओमध्ये करण कुंद्रा आणि प्रिन्स नरुलाही तिच्या या मताशी सहमत होताना दिसत होते.
सध्या आशा नेगी हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आशा नेगीच्या या व्हिडीओवर चाहतेही भरपूर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, “आशाने हे अगदी खरं आहे. व्हिडीओमुळे लोक आशा नेगीचे खूप कौतुक करत आहेत. तसेच अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
‘पवित्र रिश्ता’मधून नाव कमावल्यानंतर आशा नेगीने वेब सीरिज आणि बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला होता. ती ‘अभय सीझन 2 आणि 3’ मध्ये दिसली आहे. याशिवाय ‘ख्वाबों के परिंडे’मध्येही तिने कामं केलं. करिअरसोबतच आशा नेगी ऋत्विक धनजानीसोबतच्या नात्यामुळेही चर्चेत आली होती. ब्रेकअपनंतर अभिनेत्रीला खूप ट्रोल देखील करण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
1 जानेवारीपासून होणार ‘हे’ बदल; तुमच्या खिशावर होणार परिणाम
Malaika Arora | मलायका अरोरा-अर्जुन कपूरच्या नात्यात मिठाचा खडा, समोर आली धक्कादायक बातमी