Maharashtra | महाराष्ट्राला धक्का देणारी बातमी समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्राला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील अनेक प्रकल्प आता गुजरात घेऊन चालल्याचं पाहायला मिळत आहे. याचा मोठा फटाका मुंबईला तर पडला आहेच, मात्र आता कोकणाचं देखील नुकसान होताना दिसत आहे.

महाराष्ट्राला धक्का देणारी बातमी समोर

महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचं कळतंय. 2018 साली देशातील पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची सिंधुदुर्ग मधून घोषणा करण्यात आली होती. निवती रॉक्स जवळील समुद्रात पाण्याखालील अंतरंग न्याहाळण्याची या प्रकल्पात योजना होती. आता हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतल्याची माहिती समोर आलीये.

या प्रकल्पासाठी 56 कोटी निधी मंजूर झाला होता. मात्र राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे सिंधुदुर्गच्या पाणबुडी प्रकल्पाला चालणा मिळाली नसल्याचे चित्र आहे. या पाणबुडी प्रकल्पात पर्यटकांना समुद्राच्या पाण्याखालील अद्भुत दुनिया जवळून पाहता येणार होती.

पाणबुडी प्रकल्प गुजरातच्या दिशेला

या प्रकल्पामुळे स्थानिकांना सुद्धा रोजगार निर्मिती होणार होती. मात्र निधीची तरतूद केली असताना नेमक्या अडचणी कुठे आल्या? याचं राज्यकर्त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे. हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचं सांगितलं जात असून गुजरात सरकार आणि माझगाव डॉकयार्ड द्वारकेच्या समुद्रात असाच पाणबुडी प्रकल्प राबवत आहे. जानेवारीत व्हायब्रेट गुजरात समिटमध्ये याची अधिकृत घोषणा होणार आहे.

पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर सरकारवर निशाणा साधला आहे.

हाराष्ट्रातून एकामागोमाग एक प्रकल्प गुजरातमध्ये जात असताना आजपर्यंत महाराष्ट्र इतका थंड कधीच दिसला नाही. हे अनाकलनीय आहे. विरोधकांनी आवाज उठवायचा, आंदोलनं करायची. पण सरकारने मात्र डोळ्यावर झापडं लावून आणि कानावर हात ठेवून काही घडलंच नाही, असं दाखवायचं, हे कुठवर सहन करायचं?, असा सवाल त्यांनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

SBI ने ग्राहकांना दिली आनंदाची बातमी!

Ram Mandir | ’22 जानेवारीला घराघरात…’; नरेंद्र मोदींचं देशवासीयांना आवाहन

महत्त्वाची बातमी- 1 जानेवारीपासून तुमच्या Paytm-Gpayची UPI आयडी होऊ शकते बंद

Aishwarya Rai कडून सर्वात मोठा खुलासा, म्हणाली, “या कारणामुळे आमच्या दोघात मतभेद”

Team India: बायकांमुळे झाले बरबाद!, नाहीतर आज असते सचिन-कोहलीपेक्षा मोठे स्टार!