Team India: बायकांमुळे झाले बरबाद!, नाहीतर आज असते सचिन-कोहलीपेक्षा मोठे स्टार!

Team India | क्रिकेट हा भारताच्या रक्तात असलेला खेळ आहे. इथं जात, धर्म, पंथाच्या पलिकडे जाऊन क्रिकेटला मानणारे लोक आहेत. या खेळाची भारतात लोकप्रियता इतकी आहे की इथं खेळाडूंना चक्क देवाचा दर्जा दिला जातो. साहेबांचा खेळ मानला जाणारा क्रिकेट भारताचा अधिकृत खेळ नसला तरी भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ हा क्रिकेटच आहे. यामुळे प्रत्येक भारतीय आपल्या आयुष्यात एकदा तरी भारतीय क्रिकेटर बनण्याचा विचार करतो, परंतु लाखो भारतीयांपैकी केवळ काही निवडक भाग्यवान आणि प्रतिभावान खेळाडूंनाच टीम इंडियाकडून (Team India) खेळण्याची संधी मिळते.

आज आम्ही तुम्हाला एक नव्हे तर अशा तीन भारतीय खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी इतर महिलांसोबतच्या अफेअरमुळे आपलं सोन्यासारखं क्रिकेटचं करिअर उद्ध्वस्त केलं, जर हे 3 भारतीय खेळाडू इतर महिलांच्या अफेअरमध्ये पडले नसते तर कदाचित त्यांचं नाव सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली यांच्या आधी सुद्धा घेतलं गेलं असतं. जाणून घेऊयात कोण आहेत ही तीन नावं-

भारताचा गब्बर शिखर धवन-

Cricket News: भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) 2010 साली टीम इंडियासाठी (Team India) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये संघासाठी अनेक मॅच-विनिंग इनिंग्स खेळी खेळल्या, पण शिखर धवनने घटस्फोटित महिलेशी लग्न केलं आणि काही वर्षांच्या लग्नानंतर लगेचच त्याच्या पत्नीने त्याला सोडलं, घटस्फोटामुळे तो मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खूपच कमकुवत झाला. शिखर धवनसोबत घडलेल्या या प्रकारानंतर त्याच्या खेळावर प्रचंड वाईट परिणाम झाला. तो गेल्या वर्षभरापासून भारतीय संघासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. कदाचित त्याच्या आयुष्यात हे वादळ आलं नसतं तर क्रिकेटच्या जगतात शिखर धवन हे आणखी मोठं नाव असतं.

एकेकाळचा स्टार मुरली विजय-

Cricket News: 2008 साली टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा स्टार फलंदाज मुरली विजयने (Murali Vijay) या वर्षाच्या सुरुवातीलाच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 39 वर्षीय अनुभवी मुरली विजयने कसोटी क्रिकेटमध्ये दीर्घकाळ टीम इंडियासाठी (Team India) सलामीवीर म्हणून काम केलं.

मुरली विजयच्या विवाहबाह्य संबंधांची फारच चर्चा झाली कारण त्याचे त्याचा सहकारी दिनेश कार्तिकच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध होते. कार्तिकच्या पत्नीने त्याच्यापासून विभक्त होत थेट मुरली विजयसोबत लग्न केलं होतं. मुरली विजयच्या खेळावर याचा विपरित परिणाम झाल्याचं नेहमी बोललं जातं.

सचिनचा मित्र विनोद कांबळी-

Cricket News: क्रिकेटचा देव मानल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र विनोद कांबळी (Vinod Kambli) यानेही टीम इंडियासाठी (Team India) आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या करिअरची जबरदस्त सुरुवात केली होती, पण पदार्पण केल्यानंतर काही वर्षातच विनोद कांबळी नशेच्या आहारी गेला, सोबतच अफेअर्सचे प्रकारही घडले. या साऱ्यातच विनोद कांबळीची भारतीय क्रिकेटमधील इनिंग संपली. भारताचा दिग्गज खेळाडू अशी ओळख होण्याऐवजी प्ले-बॉय अशी नवी ओळख त्याला कायमची चिकटली.

News Title: team India cricketers career ruined due to affairs

महत्त्वाच्या बातम्या-

Pune Bus Accident | पुण्याजवळच्या ताम्हिणी घाटात बस उलटली, महत्त्वाची अपडेट हाती!

तुमच्या फोनमध्ये ‘हे’ Android Apps असतील तर आत्ताच हटवा!, गुगलने केली मोठी कारवाई

Weather Update | ऐन थर्टी फर्स्टला ‘या’ भागात पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा इशारा

Facebook, Instagram वापरताना काळजी घ्या, नाहीतर होणार अकाऊंट डिलीट; सरकारकडून नवे नियम लागू

Mutual Funds | म्युच्युअल फंडात गंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!