Facebook, Instagram | इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर तुमचे खाते असेल तर सावधान. तुमचे खाते हटवले जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, भारत सरकार अनेक खाती हटवू शकते. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? आणि कोणती खाती हटविली जातील???? आता जास्त विचार करण्याची गरज नाही, कारण येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की फेसबुक आणि इन्टाग्राम नेमकी कोणती खाती हटवणार आहे आणि तुमचं खातं त्यामध्ये असणार की नाही?, त्यामुळे खालील माहिती काळजीपूर्वक वाचा…
ही खाती हटवली जाणार!
वास्तविकपणे जी खाती दीर्घकाळापासून बंद असतील, ती खाती हटवण्याचा सरकारचा विचार आहे. यामध्ये सलग 3 वर्षांपासून बंद असलेली खाती पूर्णपणे डिलीट केली जातील. जर वापरकर्त्याने तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ एकदाही त्याचे खाते वापरले नसेल तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते आणि फेसबुक तसेच इन्स्टाग्रामवरुन हे खाते हटवले जाईल.
हा DPDP कायद्याचा (डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा) एक भाग आहे. तसेच हा नियम ऑगस्टमध्येच लागू करण्यात आला होता. आता या आराखड्यावर कार्यवाही करण्याचे नियोजन सुरू आहे. हा नियम विशेषतः सोशल मीडियासाठी तयार करण्यात आला आहे. हे नियम ई-कॉमर्स कंपन्या, गेमिंग कंपन्या, ऑनलाइन मार्केटप्लेस आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लागू केलं जाऊ शकतं. DPDP कायद्यामध्ये वापरकर्त्यांच्या डेटा सुरक्षिततेबाबत अनेक तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.
या वयातील लोकांच्या समस्या वाढतील-
ऑगस्टमध्ये अधिसूचित केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जास्तीत जास्त 25 नियम करावे लागतील. त्यासाठी कोणत्याही तरतुदीसाठी नियम बनवण्याचा अधिकार सरकारला आहे, या कायद्यांपैकी एक असा नियम आहे ज्यामध्ये मुलांच्या वयाची पडताळणी केली जाईल. याच्या मदतीने मुलं सोशल मीडियावर काय पाहू शकतात आणि काय पाहू शकत नाहीत? हे ठरवता येईल.
या नियमानुसार, इन्स्टाग्राम-फेसबुक सारखे प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना परवानगी घेणं आवश्यक असेल. ही परवानगी मुलाच्या पालकांकडून घ्यावी लागेल.
मुलांना सोशल मीडियासाठी परवानगी घ्यावी लागणार यामुळे सोशल मीडिया क्षेत्रात चर्चा सुरु आहे. या अटी कंपन्यांसाठी थोड्या त्रासदायक ठरू शकतात. दुसरीकडे सध्यातरी या कायद्यात वय पडताळणीची पद्धत उघड करण्यात आलेली नाही.
News Title: facebook instagram new update on accounts ban
महत्त्वाच्या बातम्या-
Mutual Funds | म्युच्युअल फंडात गंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!
क्रिकेट जगतात खळबळ!!! IPL खेळणारा ‘हा’ बडा क्रिकेटपटू बलात्काराच्या आरोपात दोषी, काय होणार शिक्षा?
Malaika Arora नं केली दुसऱ्या लग्नाची घोषणा… कोणासोबत लग्न करणार हे सुद्धा सांगितलं!
Entertainment News | ‘या’ बड्या अभिनेत्याची हत्या?; दिग्दर्शकाच्या पोस्टमुळे एकच खळबळ