क्रिकेट जगतात खळबळ!!! IPL खेळणारा ‘हा’ बडा क्रिकेटपटू बलात्काराच्या आरोपात दोषी, काय होणार शिक्षा?

IPL | आयपीएल तसेच जगभरातील क्रिकेट लीग्समध्ये खेळणारा नेपाळचा क्रिकेटपटू थेट अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणी दोषी आढळला आहे, या घटनेमुळे नेपाळ क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे तसेच क्रिकेटच्या जगतात देखील खळबळ उडाली आहे. नेपाळ संघाचा माजी कर्णधार आणि उत्कृष्ट लेगस्पिनर संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात दोषी आढळला आहे.

संदीपवर झालेल्या आरोपांवर महत्त्वाची सुनावणी होणार होती आणि ती झाली आणि त्यावरचा निर्णय सुद्धा आला आहे. काठमांडू जिल्हा न्यायालयाने आपला निकाल देताना संदीपला या प्रकरणात दोषी घोषित केलं आहे. संदीपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण तो जगभरातील महत्त्वाच्या लीग्समध्ये चांगली कामगिकी करत होता. तो भारताच्या T20 लीग आयपीएलमध्येही (IPL) खेळला आहे. या लीगमध्ये तो रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा (Sandeep Lamichhane IPL Team) भाग होता.

Kathmandu court convicts Sandeep Lamichhane

या प्रकरणाची मुख्य सुनावणी रविवारी सुरू झाली होती, शुक्रवारी त्यावर निर्णय आला. न्यायाधीश शिशिरराज ढकाल यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने यावर निर्णय दिला. मात्र, या प्रकरणात संदीपला किती वर्षांची शिक्षा होणार? हे अद्याप न्यायाधीशांनी सांगितलेलं नाही. याबाबतचा निर्णय पुढील सुनावणीत होणार आहे.

संदीप सध्या जामीनावर जेलबाहेर-

संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) सध्या जामिनावर बाहेर आहे. 12 जानेवारी रोजी पाटण उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. 21 ऑगस्ट रोजी काठमांडू जिल्हा न्यायालयाच्या अॅटर्नींनी 17 वर्षीय मुलीवरील बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. फौजदारी संहिता 2074 च्या कलम 219 अन्वये संदीपला आरोपी करण्यात आले होते.

संबंधित अल्पवयीन मुलीने 6 सप्टेंबर 2022 रोजी गौशालच्या महानगर पोलिस परिमंडळात संदीपविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. संदीप त्यावेळी कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोकडून खेळत होता. गुन्हा दाखल झाल्याने आणि संदीप परदेशी असल्याने पोलिसांनी त्याचे बँक खाते फ्रीज केले होते, तसेच त्याची मालमत्ता सील केली होती, त्यानंतर नेपाळ पोलिसांनी त्याला 6 ऑक्टोबर रोजी अटक केली होती.

संदीपचं क्रिकेट करिअर संपणार?

संदीप दोन वर्षे आयपीएल (IPL ) खेळलेला आहे. त्याने 2018 आणि 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केलेले आहे. संदीपची बाकी कारकीर्द चांगली राहिलेली आहे. त्याने नेपाळसाठी 51 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने 112 विकेट घेतल्या आहेत. नेपाळकडूनच 20 टी-20 सामन्यात त्याने 98 विकेट्स घेतल्या आहेत. संदीप जगभरातील अनेक T20 लीगमध्ये खेळतो. तो ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्येही खेळतो. मात्र या प्रकरणानंतर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. संदीपला किती वर्षांची शिक्षा होते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

News Title: IPL Player Sandeep Lamichhane convicted in rape case

महत्त्वाच्या बातम्या-

Malaika Arora नं केली दुसऱ्या लग्नाची घोषणा… कोणासोबत लग्न करणार हे सुद्धा सांगितलं!

Entertainment News | ‘या’ बड्या अभिनेत्याची हत्या?; दिग्दर्शकाच्या पोस्टमुळे एकच खळबळ

Ram Mandir | राम मंदिराच्या उद्घाटनाबद्दल सर्वात मोठी अपडेट, फक्त ‘या’ 5 लोकांनाच मिळणार महत्त्वाचा मान!

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त होणार!, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः करणार घोषणा

Post Office Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम योजना; मिळतील जबरदस्त रिटर्न्स