Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त होणार!, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः करणार घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Petrol Diesel Price | नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होण्याच्या चर्चा होत्या आता त्या खऱ्या होताना दिसत आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करावे की नाही?, यावर पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयामध्ये बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. जर स्वस्त करायचे असेल तर किती रुपयांची स्वस्त करावे? दोन्हींचा भार कोण उचलणार? की याचा संपूर्ण बोजा तेल कंपन्यांवरच टाकावा?, यासंदर्भात चर्चा सुरू होती. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनूसार, या संपूर्ण प्रकरणावर दोन्ही मंत्रालयांमध्ये एकमत झालं आहे. पेट्रोल आणि डिझेल (Petrol Diesel Price) स्वस्त करण्याची तयारीही सुरू झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः यासंदर्भात घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

Narendra Modi

पंतप्रधान स्वतः मोठी घोषणा करणार-

आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने पुन्हा सत्तेत येण्यासाठी मोठ्या हालचाली सुरु केल्या आहेत. नवीन वर्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) प्रतिलिटर 10 रुपयांची भेट सर्वसामान्यांना देण्याची घोषणा करू शकतात. देशातील महागाई कमी करणे हे सरकारचे प्राथमिक लक्ष्य बनले असल्याने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

महागाई कमी करण्यासाठी RBIने आधीच व्याजदर 2.50 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत. तसेच, अन्नधान्याशी संबंधित महागाई कमी करण्यासाठी सरकार आधीच अनेक पावलं उचलताना दिसत आहे. आता फक्त पेट्रोल आणि डिझेल उरले होते, जे सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरत होते. ज्यावर गेल्या काही दिवसांपासून अर्थ आणि तेल मंत्रालयात चर्चा सुरू होती.

पेट्रोल आणि डिझेल (Petrol Diesel Price) स्वस्त करण्यासंदर्भात याआधीही बातम्या आल्या होत्या. दोन्ही मंत्रालयांना डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत काय राहते? याचं निरीक्षण करायचं होतं. जर कच्च्या तेलाच्या किंमती 80 डॉलर किंवा त्याहून कमी राहिली तर जानेवारीच्या सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता.

Petrol Diesel Price
Petrol Diesel Price

किंमतीच्या तफावतीचा भार कोण उचलणार?

तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाची किंमत 80 डॉलर आणि त्यापेक्षा कमी आहे. त्याचबरोबर रशियाकडून कच्चे तेल घेऊन तेल कंपन्यांना खूप फायदा झाला आहे. याशिवाय या कंपन्यांच्या समभागांच्या वाढीमुळे मूल्यांकनातही वाढ दिसून आली आहे. अशा परिस्थितीत सरकार तेल कंपन्यांनाच पेट्रोल आणि डिझेल स्वस्त (Petrol Diesel Price) करण्यास सांगणार आहे. सरकार आपल्या बाजूने कोणतीही कर कपात करणार नाही. याचा अर्थ तेल कंपन्याच दरात कपात करून पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करतील.

गेले वर्षे तेल कंपन्या तोट्यात होत्या पण रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करून कंपन्यांना आधी नफ्यात आणले गेले. तेल कंपन्यांनी प्रचंड नफा कमावल्याचे गेल्या तीन तिमाहींच्या निकालांवरून स्पष्ट होत आहे. पेट्रोल आणि डिझेलमधून (Petrol Diesel Price) कंपन्यांना भरपूर नफा मिळत आहे. त्यामुळे कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी वाढ होताना दिसत आहे.

कच्च्या तेलाची किंमत किती आहे?

सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे, त्याचे कारण म्हणजे डॉलरचा घसरणारा निर्देशांक. फेड पुढील वर्षी व्याजदरात कपात करू शकते. या बातमीमुळे डॉलरच्या निर्देशांकात सातत्याने घसरण होत आहे. आकडेवारीनुसार आखाती देशांतून कच्च्या तेलाचा व्यापार 77.52 डॉलर प्रति बॅरलवर होत आहे. दुसरीकडे, अमेरिकन तेल प्रति बॅरल 72.04 डॉलरवर व्यापार करत आहे.

गेल्या वर्षी मार्च-एप्रिलच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 60 ते 70 डॉलरने घसरल्या आहेत. विशेष बाब म्हणजे ओपेक सातत्याने उत्पादन कमी करत आहे, तरीही चालू वर्षात कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरच्या पुढे गेलेल्या नाहीत.

तज्ज्ञांचं काय मत आहे?-

एचडीएफसी सिक्युरिटीचे करन्सी कमोडिटी हेड अनुज गुप्ता यांनी सांगितले की, सुमारे एक महिन्यापासून असा अंदाज लावला जात होता की, पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात प्रति लिटर 10 रुपयांची घट होऊ शकते. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण हे त्याचे प्रमुख कारण आहे. डिसेंबर महिन्यात ‘रेड ओसियन’च्या समस्येनंतरही कच्च्या तेलाच्या किमतीत फारशी वाढ झालेली नाही. कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 75 डॉलरच्या आसपास राहिली. ज्याची सरकारकडून सातत्याने दखल घेतली जात होती. त्याचा फायदा आता सरकार सर्वसामान्यांना देणार असल्याची माहिती आहे.

Petrol
Pc/Pixabay
दरात शेवटचा बदल कधी झाला?-

भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) फार दिवसांपासून बदल झालेला दिसत नाही. देशातील महत्त्वाच्या महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल 21 मे रोजी दिसून आला होता. त्यावेळी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरील कर कमी केला होता. त्यानंतर काही राज्यांनी स्वतः व्हॅट कमी करून किंवा वाढवून किमतींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती रोज बदलू लागल्यापासून पेट्रोलियम कंपन्यांनी विक्रमी वेळेत कोणताही बदल न करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर खालील प्रमाणे-

नवी दिल्ली: पेट्रोलचा दर: 96.72 रुपये प्रति लिटर, डिझेलचा दर: 89.62 रुपये प्रति लिटर
कोलकाता: पेट्रोलचा दर: 106.03 रुपये प्रति लिटर, डिझेलचा दर: 92.76 रुपये प्रति लिटर
मुंबई: पेट्रोलचा दर: 106.31 रुपये प्रति लिटर, डिझेलचा दर: 94.27 रुपये प्रति लिटर

चेन्नई: पेट्रोलचा दर: 102.63 रुपये प्रति लिटर, डिझेलचा दर: 94.24 रुपये प्रति लिटर
बेंगळुरू: पेट्रोल दर: ​​101.94 रुपये प्रति लिटर, डिझेल दर: ​​87.89 रुपये प्रति लिटर
चंदीगड: पेट्रोलचा दर: 96.20 रुपये प्रति लिटर, डिझेलचा दर: 84.26 रुपये प्रति लिटर

गुरुग्राम: पेट्रोल दर: ​​97.18 रुपये प्रति लिटर, डिझेल दर: ​​90.05 रुपये प्रति लिटर
लखनौ: पेट्रोल दर: ​​96.57 रुपये प्रति लिटर, डिझेल दर: ​​89.76 रुपये प्रति लिटर
नोएडा: पेट्रोल दर: ​​96.79 रुपये प्रति लिटर, डिझेल दर: ​​89.96 रुपये प्रति लिटर

News Title: Petrol Diesel Price latest update

महत्त्वाच्या बातम्या-

Omicron J1 | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं भीती वाढवली, ‘ही’ लक्षणं असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा!

Pavitra Punia | शूट करताना ब्लाऊजचं हुक तुटलं…; अभिनेत्रीबरोबर घडला धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल

Aishwarya Rai च्या बातम्या… मात्र ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं थेट मुलीसह घर सोडलं, बॉलिवूडमध्ये उडाली खळबळ

Petrol Diesel Price | मोदीबाबांचा सिक्रेट सांता! पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबत सर्वात मोठी बातमी

Relationship Tips | पार्टनर रागीट असेल तर ‘या’ गोष्टी करा; खूप उपयोगी पडतील