Omicron J1 | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं भीती वाढवली, ‘ही’ लक्षणं असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Covid 19 Omicron J1 | कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन J1 भारतात वेगानं पसरत चालला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने भर होत असल्यानं सरकारी चिंता वाढली आहे. सरकारने सर्वसामान्य जनतेला काळजी घेण्याचं तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. सरकारच्या या आवाहनानंतरही लोकांमध्ये मात्र पुरेसी काळजी दिसत नाही, कारण हलगर्जीपणाचे अनेक प्रकार समोर येत आहे, मात्र असा हलगर्जीपणा जीवावर बेतू शकतो, तेव्हा सावधान

कोरोना हा एक अत्यंत जीवघेणा आजार होता, मात्र लसीकरणानंतर त्याचा प्रभाव कमी झाला, आता हा आजार आपलं रुप बदलून नवनव्या व्हेरियंटच्या रुपात अवतरताना दिसत आहे. इतर व्हेरियंटपेक्षा सध्याचा व्हेरियंट Omicron J1 थोडा घातक असल्याचं दिसत आहे, कारण या व्हेरियंटचा प्रसार अत्यंत वेगानं होत आहे. या व्हायरसची लक्षणे बहुतेकदा इतर ओमिक्रॉन उपप्रकारांसारखीच असतात.

ही लक्षणं असतील तर डॉक्टरांकडे जा-

ताप, खोकला, सर्दी- ओमिक्रॉन J1 व्हायरसमुळे येणारा ताप सामान्यतः 38 अंश सेल्सिअस किंवा त्याहून जास्त असतो. या व्हायरसमुळे सर्दी सुद्धा होऊ शकते. सामान्यतः नाक वाहणे, घसा खवखवणे आणि गळ्यात दुखणे तसेच यामुळे होणारा खोकला सामान्यतः कोरडा असतो.

थकवा, मांसपेशीत वेदना आणि डोकेदुखी- ओमिक्रॉन J1 (Omicron J1) व्हायरसमुळे होणारा थकवा सामान्यतः तीव्र असतो आणि रुग्णाला कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. मांसपेशीत होणाऱ्या वेदना सामान्यतः संपूर्ण शरीरात होतात. तसेच डोकेदुखी सामान्यतः तीव्र स्वरुपाची असते आणि रुग्णाला उलट्या होण्याचा त्रास होऊ शकतो.

अधिक गंभीर लक्षणं असू शकतात-

श्वास घेण्यास त्रास तसेच छातीत दुखणे- ओमिक्रॉन J1 व्हायरसमुळे श्वास घेण्यास त्रास सामान्यतः तीव्र स्वरुपाचा असू असतो. रुग्णाला खोकताना किंवा हालचाल करताना श्वास घेण्यास त्रास जाणवू शकतो. या व्हायरसमुळे (Omicron J1) छातीत दुखणे सुद्धा सामान्यतः तीव्र स्वरुपाचे असते आणि रुग्णाला छातीत दबाव किंवा जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो.

तीव्र स्वरुपाची सर्दी आणि इतर लक्षणं- ओमिक्रॉन J1 (Omicron J1) व्हायरसमुळे तीव्र स्वरुपाची सर्दी होऊ शकते. सामान्यतः नाकातून रक्त येणे, नाकातून वाहणे आणि घसा खवखवणे या स्वरूपाची लक्षणं दिसू शकतात. दृष्टी, चव आणि वास यांच्यात फरक जाणवू शकतो. ही लक्षणं काही आठवड्यांपर्यंत टिकू शकतात, त्यामुळे अशा प्रकारची काही लक्षणं असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार घेणं गरजेचं आहे.

News Title: Omicron J1 typical symptoms

महत्त्वाच्या बातम्या-

Pavitra Punia | शूट करताना ब्लाऊजचं हुक तुटलं…; अभिनेत्रीबरोबर घडला धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल

Aishwarya Rai च्या बातम्या… मात्र ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं थेट मुलीसह घर सोडलं, बॉलिवूडमध्ये उडाली खळबळ

Petrol Diesel Price | मोदीबाबांचा सिक्रेट सांता! पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबत सर्वात मोठी बातमी

Relationship Tips | पार्टनर रागीट असेल तर ‘या’ गोष्टी करा; खूप उपयोगी पडतील

Aishwarya Rai आणि अभिषेक यांचा घटस्फोट निश्चित?, ‘ही’ कारणं आली समोर