Petrol Diesel Price | मोदीबाबांचा सिक्रेट सांता! पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबत सर्वात मोठी बातमी

Petrol Diesel Price | पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचा जोरदार तयारी सुरु झाली आहे. जनतेला खूष करण्यासाठी सरकारने देखील कंबर कसल्याचं दिसतंय. सर्वसामान्यांना गेल्या काही वर्षांमध्ये महागाईचा मोठा फटका बसला आहे, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी सर्वसामान्यांची कंबर मोडली आहे, अशात आता निवडणुकांच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईतून मोठा दिलासा देण्याची तयारी सरकारने सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्याची घोषणा करू शकते, अशी बातमी आहे.

गेल्या वर्षी 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) दीर्घकाळापासून तशाच कायम आहेत. गेल्या वेळी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केले होते. या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये एकूण कपात अनुक्रमे 13 रुपये आणि 16 रुपये प्रति लिटर इतकी झाली होती

किती रुपयांनी स्वस्त होणार?

पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price) दर कमी करण्यासाठी सरकार तेल कंपन्यांशी चर्चा करत आहे. तर दुसरीकडे यावर पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय यांच्यात देखील चर्चा केली जात असल्याची माहिती आहे. सर्व काही सुरळीत असल्यास आणि सरकारला शक्य असल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर 6 ते 10 रुपयांनी स्वस्त होऊ शकतात, अशी माहिती आहे. त्यामुळे सरकारच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सध्या काय दर आहेत?

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (IOCL) वेबसाइटनुसार, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपासून ते कोलकातापर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आज दिल्लीत पेट्रोलची किंमत (Delhi Petrol Price) 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईत पेट्रोलचे (Mumbai Petrol Price) दर 106.31 रुपये तर डिझेलचे दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहेत. चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर इथे पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर आहे, तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण-

गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत (Petrol Diesel Price) सातत्याने घसरण झालेली पहायला मिळत आहे. सध्या कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 80 डॉलरच्या आसपास आहेत, ज्यामुळे तेल कंपन्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आता आशा आहे की सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी कपात करुन सर्वसामान्य जनतेलाही महागाईतून दिलासा देईल.

News Title: petrol diesel price cut update

महत्त्वाच्या बातम्या

Relationship Tips | पार्टनर रागीट असेल तर ‘या’ गोष्टी करा; खूप उपयोगी पडतील

Aishwarya Rai आणि अभिषेक यांचा घटस्फोट निश्चित?, ‘ही’ कारणं आली समोर

Aishwarya Rai | सलमान सोबतच्या ब्रेकअपबद्दल पहिल्यांदाच मोठा खुलासा, ही कारणं आली समोर

Share Market | झुनझुनवालांनी ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समधून कमावले 14,428 कोटी!

‘तिच्यासारखी कोणी भेटलीच नाही’; पहिल्या प्रेमाबद्दल बोलताना Ratan Tata भावूक