Aishwarya Rai च्या बातम्या… मात्र ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं थेट मुलीसह घर सोडलं, बॉलिवूडमध्ये उडाली खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aishwarya Rai | बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या वर्तुळात रंगलेल्या आहेत., मात्र आता इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री ईशा कोप्पीकरबाबत (isha koppikar) धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘खल्लास गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली ईशा लग्नाच्या 14 वर्षांनंतर आता तिच्या पतीपासून विभक्त झाल्याची माहिती समोर आली आहे, तिने अद्याप जरी याबाबत स्पष्ट खुलासा केला नसला तरी आपल्या मुलीसोबत तीने घर सोडल्याची माहिती आहे.

14 वर्षांच्या लग्नाचा शेवट-

अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या ईशा कोप्पीकरच्या (isha koppikar) घटस्फोटाच्या बातम्या आहेत. तिने लग्नाच्या 14 वर्षानंतर तिचा पती टिमी नारंगला घटस्फोट दिल्याची माहिती आहे. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनूसार, दोघांनी नोव्हेंबर 2023 मध्येच घटस्फोट घेतलेला आहे. दोघांनाही एक मुलगी आहे, जी तिच्या आईसोबत राहत आहे. घटस्फोटाच्या या चर्चा खऱ्या असल्याचं सांगितलं जातंय, कारण ईशाच्या इंस्टाग्रामवरून तिच्यामधील आणि तिचा पती टिमीमधील अंतर स्पष्ट होत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनूसार, ईशा आणि टिमीने आपलं नातं वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, हा निर्णय घेण्याआधी दोघांनी पुरेसा वेळ देखील घेतला, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. कालांतराने घटस्फोट घेण्याचा त्यांचा निर्णय पक्का झाला. एकमेकांशी पटतच नसल्यामुळे दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

ईशानं मुलीसह घर सोडलं-

घटस्फोटानंतर ईशाने (isha koppikar) आता तिच्या 9 वर्षांच्या मुलीसह पतीचं घर सोडलं आहे. ती आपल्या मुलीसह वेगळ्या घरात राहत आहे. तसं पाहिलं तर, या अभिनेत्रीचे इंस्टाग्राम तिच्या आईच्या आणि मुलगीच्या दोघांच्या व्हिडिओ आणि फोटोंनी भरलेले आहे आणि टिमी तिच्या फोटोंमध्ये बऱ्याच काळापासून दिसलेला नाही.

या प्रकरणी अभिनेत्रीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तिने सध्या या प्रकरणावर बोलायचे नसून, स्वतःला गोपनीयता हवी असल्याचे सांगितले. यावरुनच दोघांच्या नात्यात सर्व काही अलबेल नसल्याचं स्पष्ट होतंय.

दरम्यान, टिमी नारंगचे खरे नाव रोहित नारंग आहे आणि ईशाने (isha koppikar) 2009 साली त्याच्याशी लग्न केले होते. पण आता लग्नाच्या 14 वर्षानंतर त्यांचा प्रेमविवाह संपुष्टात आला आहे. ईशा आणि रोहितची भेट जीममध्ये वर्कआऊट दरम्यान झाली होती. जिथे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले होते.

News Title:  aishwarya rai divorce news about isha koppikar

महत्त्वाच्या बातम्या-

Petrol Diesel Price | मोदीबाबांचा सिक्रेट सांता! पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबत सर्वात मोठी बातमी

Relationship Tips | पार्टनर रागीट असेल तर ‘या’ गोष्टी करा; खूप उपयोगी पडतील

Aishwarya Rai आणि अभिषेक यांचा घटस्फोट निश्चित?, ‘ही’ कारणं आली समोर

Aishwarya Rai | सलमान सोबतच्या ब्रेकअपबद्दल पहिल्यांदाच मोठा खुलासा, ही कारणं आली समोर

Share Market | झुनझुनवालांनी ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समधून कमावले 14,428 कोटी!