‘तिच्यासारखी कोणी भेटलीच नाही’; पहिल्या प्रेमाबद्दल बोलताना Ratan Tata भावूक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ratan Tata Birthday | भारतातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा आज 86 वर्षांचे झाले आहेत. आज त्यांचा 86 वा वाढदिवस आहे. रतन टाटा हे लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांचे विचार, त्यांचे जीवन आणि त्यांचं कार्य असं आहे की त्यातून खूप काही शिकता येतं.

पहिल्या प्रेमाबद्दल बोलताना Ratan Tata भावूक

रतन टाटा (Ratan Tata) यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. इतके श्रीमंत असूनही ते साधेपणाने जीवन जगण्यासाठी ओळखले जातात. पण आजवर रतन टाटांनी लग्न केलं नाही. ते अविवाहीत राहिले. Humans of Bombay ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या पहिल्या प्रेमाचा उल्लेख केला होता.

पहिलं प्रेम प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं. जे आपण कधीच विसरू शकत नाही. रतन टाटांची Love Story देखील अशीच काहीशी आहे. पण रतन टाटांची Love Story चा शेवट गोड होऊ शकला नाही. त्यांचं प्रेम त्यांना मिळालं नाही. याच प्रेमाबद्दल रतन टाटा एका मुलाखतीत बोलले.

रतन टाटा त्यांच्या आयुष्यात चार वेळा प्रेमात पडले होते पण कोणाशीही लग्न करू शकले नाही. एका मुलाखतीदरम्यान लव्ह लाईफबद्दल बोलताना रतन टाटांनी सांगितलं की मी चार वेळा प्रेमात पडलो आणि हे प्रेम इतकं वाढलं की हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचलं पण शेवटी लग्न होऊ शकलं नाही.

“तिच्यासारखी कोणी पुन्हा भेटलीच नाही, जिला पत्नी म्हणू शकू”

रतन टाटांना पहिल्यांदा अमेरिकेतील मुलीच्या प्रेमात पडले होते. आपण लग्न करणार होतो पण काही कामानिमित्त भारतात यावं लागलं त्यामुळे लग्न होऊ शकलं नाही, असं रतन टाटांनी सांगितलं. तिला भारतातही येता आलं नाही. कारण 1962 मध्ये भारत-चीन युद्धामुळे ती भारतात येऊ शकली नाही आणि काही वर्षांनी तिचं लग्न अमेरिकेत झालं, असं त्यांनी सांगितलं. यानंतर तिच्यासारखी कोणी पुन्हा भेटलीच नाही, जिला पत्नी म्हणू शकू, असंही त्यांनी सांगितलं.

स्टार्टअप गुडफेलोजच्या उद्घाटन समारंभात, रतन टाटा यांनी पहिल्यांदाच त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी शेअर केल्या होत्या. तुम्हाला माहित नाही की एकटं राहणं काय असतं, जोपर्यंत तुम्हाला एकटा वेळ घालवायला भाग पाडलं जात नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, असं ते म्हणालेत.

रतन टाटांच्या व्यक्तिमत्त्वाचा लोकांवर खूप प्रभाव पडतो. त्यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Manoj Jarange राजकारणात एन्ट्री करणार?; जरांगेंनी अखेर सांगितलं

Captain Vijayakanth | मोठी बातमी! बड्या अभिनेत्याचं कोरोनामुळे निधन

Uddhav Thackeray | महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, ‘ती’ महत्त्वाची मागणी काँग्रेसने फेटाळली!

Aishwarya Rai | “तुझा तूच फोटो काढ!”, अभिषेक ऐश्वर्याचा तो व्हिडीओ आता व्हायरल

Maharashtra News | एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का, बडा नेता शरद पवारांच्या गळाला?