“Rohit Sharma ने ही मोठी घोडचूक केली”; रवी शास्त्रींनी रोहितच्या नेतृत्त्वावरच उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma | भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे. टी-२० सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद मिळालं तर एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ विजेता ठरला. आता कसोटी मालिका (INDvsSA Test Series) जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं दिसत आहे.

पहिल्यांदा फलंदाजी करताना के.एल. राहुल (KL Rahul) वगळता भारतीय संघाच्या फलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांपुढे टीकाव धरता आला नाही, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने मात्र भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या 245 धावांत माघारी परतला तर दुसरीकडे आफ्रिकेच्या खेळाडूंनी मात्र 408 धावा केल्या, आता यावरुन जोरदार प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

रवी शास्त्रींची रोहितच्या कर्णधारपदाबद्दल टीका-

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी भारतीय संघाच्या या खेळीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. स्टार स्पोर्टसशी बोलताना त्यांनी थेट रोहितच्या नेतृत्त्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

खेळाच्या दुसऱ्या दिवशी लंचनंतर लगेचच प्रसिद्ध कृष्णा (Prasiddha Krishna) आणि शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) गोलंदाजी देण्याचा रोहित शर्माचा निर्णय योग्य नव्हता. रोहित शर्माने या ठिकाणी सर्वात मोठी घोडचूक केली आणि त्याचा फटका टीम इंडियाला बसला आहे, अशा शब्दात रवी शास्त्री यांनी नाराजी व्यक्त केली.

मी जेव्हा संघाचा मुख्य प्रशिक्षक होतो तेव्हा…

“मी जेव्हा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होतो तेव्हा मी या गोष्टींची चर्चा संघासोबत केलेली आहे. आम्ही कुठल्याही सेशनची सुरुवात करताना त्या वेळच्या सर्वोत्तम गोलंदाजाला पहिलं प्राधान्य द्यायचो. तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या सहज लक्षात येईल, भारतीय संघानं पहिल्या तासात एक फार मोठी संधी वाया घालवली. रोहित शर्माने (Rohit Sharma) ज्या दोन गोलंदाजांसोबत सुरुवात केली, तिथंच त्याने सर्वात मोठी घोडचूक केली”, असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गरने जबरदस्त शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांची चांगलीच धुलाई केली. जेवणानंतर प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुलला गोलंदाजी देण्याचा रोहितचा (Rohit Sharma) निर्णय त्याने चांगलाच चुकीचा ठरवला होता.

News Title: team india former coach on rohit sharma indvssa

थोडक्यात बातम्या-

Captain Vijayakanth | मोठी बातमी! बड्या अभिनेत्याचं कोरोनामुळे निधन

Uddhav Thackeray | महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, ‘ती’ महत्त्वाची मागणी काँग्रेसने फेटाळली!

Aishwarya Rai | “तुझा तूच फोटो काढ!”, अभिषेक ऐश्वर्याचा तो व्हिडीओ आता व्हायरल

Maharashtra News | एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का, बडा नेता शरद पवारांच्या गळाला?

Ram Mandir | उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही; संजय राऊत संतापून म्हणाले…