Manoj Jarange राजकारणात एन्ट्री करणार?; जरांगेंनी अखेर सांगितलं

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून राज्यभर जाहीरसभा घेत आहेत. जरांगेंच्या सभेला लाखो लोक उपस्थित असतात. शिवाय पार पडलेल्या सभेत जरांगे पाटलांना मराठा बांधवांनी चांगला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळत आहे. जालना येथे आमरण उपोषण झाल्यानंतर जरांगे पाटलांना सरकारने काही दिवस थांबा आम्ही लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असं आश्वासन दिलं होतं.

पुढे काय घडलं?

दरम्यान, जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेत सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, सरकारने आद्यपही कोणता ठोस निर्णय घेतलेला नाहीये. त्यामुळे जरांगे पाटील (Manoj Jarange) 20 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानात पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे जरांगे पाटील राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा होत्या.

जरांगे पाटील राजकारणात एन्ट्री करणार?

जरांगे पाटील राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता जरांगे पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना राजकारणात जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर, जरांगे म्हणाले की, “मी राजकारणात जाणार नाही…मराठा समाजाने राजकारणात जाण्यास सांगितलं तर मी हिमालयातच जाईल, अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिलीये.

पुढे काय म्हणाले?

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, मी प्रामाणिक आहे. जे पोटात आहे ते ओठात आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी त्यांचं स्वप्न काय आहे ते देखील सांगितलं. जरांगे म्हणाले, ‘काहीही होऊ दे, समाजाच्या हितासाठी थेट आंदोलन करायचं.

गोरगरिबांच्या लेकरांसाठी मला त्यांच्या पदरात आरक्षण टाकायचं आहे. समाजाबद्दल मला एक टक्काही शंका नाही पण राजकारण नकोच. आंदोलनातून मी समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो, सत्तेत नसताना मी 54 लाख लोकांना न्याय देऊ शकलो, मग सत्तेत जाण्याची गरज नाही, असं जरांगे म्हणाले.

News Title : Manoj Jarange talks about political entry

थोडक्यात बातम्या-

Captain Vijayakanth | मोठी बातमी! बड्या अभिनेत्याचं कोरोनामुळे निधन

Uddhav Thackeray | महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, ‘ती’ महत्त्वाची मागणी काँग्रेसने फेटाळली!

Aishwarya Rai | “तुझा तूच फोटो काढ!”, अभिषेक ऐश्वर्याचा तो व्हिडीओ आता व्हायरल

Maharashtra News | एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का, बडा नेता शरद पवारांच्या गळाला?

Ram Mandir | उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही; संजय राऊत संतापून म्हणाले…