Captain Vijayakanth | मोठी बातमी! बड्या अभिनेत्याचं कोरोनामुळे निधन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

चेन्नई | अभिनेते आणि तामिळनाडूमधील मोठे राजकीय व्यक्तीमत्व कॅप्टन विजयकांत (Captain Vijayakanth) यांचं निधन झालं आहे. विजयकांत (Captain Vijayakanth) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. मात्र अचानक कॅप्टन विजयकांत यांच्या मृत्यूची बातमी येऊन धडकल्याने त्यांचे चाहते, कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.

अभिनेते Vijayakanth यांचं निधन

71 वर्षीय अभिनेते-राजकारणी विजयकांत यांना गेल्या काही दिवसांपासून सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती.

डीएमडीकेचे प्रमुख Captain Vijayakanth 20 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. या महिन्यातच ते रुग्णालयातून घरी परतले होते. विजयकांत यांचं फिल्मी करिअरसुद्धा दमदार होतं. त्यांनी बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

कोरोनाशी झुंज अपयशी

विजयकांत यांनी 154 चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यातील बरेच चित्रपट हिट ठरलं होतं. चित्रपटांनंतर, त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी डीमडीकेची स्थापना केली आणि विरुधाचलम आणि ऋषिवंद्यम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत दोनदा विधानसभेचे सदस्य म्हणून काम केलं.

2006 च्या विधानसभा निवडणुकीत 8 टक्के मतांसह आमदार झालेल्या विजयकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला होता. नंतर ते 2011 ते 2016 पर्यंत तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेते बनले.

दरम्यान, आधी विजयकांत यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणलं जाईल आणि त्यांनतर अंत्यदर्शनासाठी DMDK च्या पक्ष कार्यालयामध्ये नेण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Ram Mandir | उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही; संजय राऊत संतापून म्हणाले…

Raj Thackeray | राज ठाकरे भाजपसोबत जाणार की एकनाथ शिंदेंना साथ देणार?, सहाव्या भेटीबाबत महत्त्वाची माहिती

Aishwarya Rai | ‘…मला खूप सहन करावं लागलं’; अभिषेक बच्चनचा सर्वात मोठा खुलासा!

Ajit Pawar | महायुतीत वादाची ठिणगी; भाजप-शिंदे गटाचे अजित पवारांवर गंभीर आरोप

Salman Khan | ‘…म्हणून मी आजवर एकही किसिंग सीन दिला नाही’; अखेर सलमानने सांगितलं कारण