Ajit Pawar | महायुतीत वादाची ठिणगी; भाजप-शिंदे गटाचे अजित पवारांवर गंभीर आरोप

पुणे | ठाकरे सरकार असताना अजित दादांच्या (Ajit Pawar) दादागिरीला कंटाळून सरकारमधून बाहेर पडत असल्याचं शिंदे गटाने सांगितलं होतं. तसेच अजित पवारांवर निधी देत नसल्याचा आरोप देखील केला होता. आता पुन्हा तेच होताना दिसत आहे. अजित पवार हे भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तेत सामील झाले असले तरी या तिन्ही गटांमध्ये एकामागे एक खटके उडताना दिसत आहे.

महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर

महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. महायुतीमध्ये देखील अजित पवारच अडचणीचे ठरत असल्याचं दिसतंय. भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील नेत्यांनी अजित पवारांवर थेट आरोप केला आहे. आता अजित पवार गट विरुद्ध शिंदे भाजप गट असा नवा संघर्ष सुरू झाला आहे.

अजित पवारांवर गंभीर आरोप

शिंदे गट आणि भाजप यांनी अजित पवार गटावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. यावेळी अजित पवार गटावर गंभीर आरोपही करण्यात आलाय. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आपल्याला विकासनिधी मिळत नसल्याचा आरोप पुणे जिल्ह्य़ातील भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी केलाय.

भाजप आणि शिंदे गटाच्या दहा सदस्यांनी जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देऊन या संदर्भाचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे पुण्यात अजित पवार गटविरुद्ध भाजप शिंदे गट असा नवा संघर्ष सुरू झाला आहे.

पालकमंत्री अजित पवार यांनी भाजप शिंदे गटाला डावलून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आणि आपल्या समर्थकांना जवळपास 800 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. ही कामे तात्काळ थांबावेत अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ, असा गंभीर इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

एकूण निधीपैकी 60 ते 70 टक्के निधी अजित पवारांनी आपल्या समर्थकांनाच दिल्याचा आरोप करत शिंदे गट भाजपच्या पदाधिकाऱ्यांची केवळ पाच ते दहा टक्क्यांवर बोलवणं करण्यात आल्याचं देखील आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Post Office Scheme | नवरा-बायकोसाठी पोस्टाची जबरदस्त योजना; 5 वर्षात जमतील ‘इतके’ लाख रूपये

Pune Gas Cylinder Blast | मोठी बातमी! पुण्यात एकाच वेळी दहा सिलेंडरचा स्फोट

Ram Mandir | जमीन विकून दिली होती ‘इतक्या’ कोटींची देणगी; पहिल्या देणगीदाराला प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण

Post Office Scheme | महिलांसाठी पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; फायदाच फायदा

Salman Khan Net Worth | सलमान खानच्या संपत्तीचा आकडा समोर; वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे